Told the pregnant woman you are positive 
अहिल्यानगर

खासगी कोरोना लॅबचा खेळ ः निगेटिव्ह असतानाही गर्भवतीला टाकले बाधितांच्या कक्षात...मग सुरू झाली जीवन-मरणाची लढाई

अमित आवारी

नगर : कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. बाधितांचा आकडाही गगनाला भिडला आहे. त्यामुळे सर्वत्र भीती आणि भीतीचेच वातावरण आहे. सामूहिक संसर्ग सुरू झाल्याने ही स्थिती उदभवली आहे. सरकारी दवाखान्यासोबतच आता खासगी दवाखान्यातील लॅबलाही कोरोना चाचणीची मान्यता देण्यात आली आहे.

या खासगी लॅब लोकांच्या जिवाशी खेळत आहेत. मागच्याच आठवड्यात एका रूग्णाला खासगी लॅबने निगेटिव्ह जाहीर केले होते. मात्र, त्याचा सरकारीतील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच लॅबमध्ये आज झालेला प्रकार संतापजनक आहेच, परंतु जिवावर बेतणाराही आहे. 

नगर शहरातील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील एक अधिकारी कोरोना बाधित आढळला. त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाची चाचणी केली. या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने पत्नीसह मुलाची टेस्ट करून घेण्याचे ठरवले. बुधवारी (ता. 15) शहरातील एका खासगी लॅबमध्ये स्वतःचा स्वॅब तपासणीसाठी दिला.

दुसऱ्या दिवशी पत्नीच्या घशात थोडी खवखव होत असल्याने त्याने पत्नी व मुलीचेही स्वॅप तपासणीसाठी पाठवून दिले. शुक्रवारी (ता. 17) रात्री दहा वाजेच्या सुमारास दुरध्वनीवरून पत्नी कोरोना बाधित असल्याचे खासगी लॅबकडून सांगितले.

गर्भवती पत्नीला कोरोना झाल्याने कर्मचाऱ्यावर जणू आभाळच कोसळले. लहान मुलीची देखभाल करणे व पत्नीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर आल्या. त्याने खासगी लॅबला पुन्हा पुन्हा पत्नी कोरोना बाधित असल्याचा अहवाल मागितला. मात्र, त्या खासगी लॅबने अहवाल न देता जिल्हा रुग्णालयात पत्नीला दाखल करण्याचा सल्ला दिला.

जिल्हा रुग्णालयानेही अहवाल नसताना या गर्भवती महिलेला दाखल करून घेत कोरोना बाधितांच्या वॉर्डमध्ये टाकत उपचार सुरू केले. 

कोरोना बाधित रुग्णांत त्या गर्भवती महिलेवर जिल्हा रुग्णालयात सुरू झाले. दरम्यानच्या काळात त्याचा व मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला. त्या कर्मचाऱ्याचे मनात काही तरी संशय आला. त्याने त्या लॅबमध्ये जाऊन पत्नीचा अहवाल मागितला. तो अहवाल पाहून पुन्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने स्वतःला सावरत पुढची प्रक्रिया सुरू केली. जी महिला म्हणाली होती की, तुमची पत्नी कोरोना बाधित आहे. त्या महिलेजवळ संबंधित कर्मचारी गेला. ती महिला नंतर चिडीचूप झाली. 

तो लगबगीने तेथून निघाला आणि डोळ्यातील आसवांसह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात गेला. तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्नीचा अहवाल दाखवित आपबिती सांगितली. त्या अधिकाऱ्यांनी तातडीने या महिलेची अँटीजेन चाचणी करायला लावली.

यात ती पुन्हा कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल हाती आला. आणि त्या कर्मचाऱ्याने देवाचे आभार मानले. जिल्हा रुग्णालयानेही तातडीने आपली चूक झाकत त्या महिलेला घरी सोडून दिले.

या संतापजनक घटनेत कोण दोषी आहे, कोणाला किती शिक्षा होईल की नाही या पुढचा भाग झाला. आम्ही हे केलेच नाही, असे सांगून प्रत्येकजण आपले काळे हात झटकणार. आणि आपण या प्रकरणात कसे निगेटिव्ह आहोत हे जीव तोडून सांगणार. परंतु एकंदरीत या घटनेने नगरच्या आरोग्य विभागाचे आणि प्रशासनाचे धिंडवडे उडाले आहेत. त्या महिलेच्या पोटातील बाळाला झालेल्या शिक्षेचेही पातक त्या यंत्रणेच्याच माथी जाणार आहे.

संपादन - अशोक निंबाळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT