Transfer of 48 officers appointment of Yadav to kotwal and Salve to Artillery
Transfer of 48 officers appointment of Yadav to kotwal and Salve to Artillery esakal
अहमदनगर

Ahmednagar News : पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहरासह जिल्ह्यातील ४८ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत. त्यात शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची, तर तोफखाना पोलिस ठाण्यात मधुकर साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही पोलिस ठाण्यांचे निरीक्षक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होते. त्यात नेवासे येथील पोलिस निरीक्षक विजय करे हे वाळूच्या देवाणघेवाणीवरून व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लीपमुळे चर्चेच आले, तर सुपा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे हे एका महिलेला मारहाण करत असल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

त्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला. दरम्यान, पोलिस अधीक्षक ओला यांनी गोकावे यांचे निलंबन केले, तर शहरासह जिल्ह्यातील तब्बल ३३ पोलिस निरीक्षक आणि १५ सहायक निरीक्षकांच्या बदलीचे आदेश देखील काढले.

त्यात शहरातील संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून कर्जत येथील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची, तर तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून जिल्हा विशेष शाखेचे मधुकर साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांची नगर तालुका, तर नगर तालुक्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांची एमआयडीसीत बदली केली. महिला पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांची सुपा येथे बदली करण्यात आली आहे.

ओला घेणार आढावा

शहरासह जिल्ह्यातील ४८ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक ओला यांनी काढले. त्यात अनेक अधिकाऱ्यांनी तत्काळ पदभार देखील स्वीकारला. मात्र, आता बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नवीन ठिकाणी काम करताना कसोटी लागणार आहे. कारण, पोलिस अधीक्षक ओला हे स्वतः या अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत.

सोशल मीडियावर बदनामी

जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी आहोरात्र काम करतात. मात्र काही कर्मचारी व अधिकाऱ्यांमुळे पोलिसांचे नाव बदनाम होत आहे. नेवासे येथील अवैध वाळू वाहतुकीबाबतची आॅडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यापोठोपाठ सुपा येथील पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला. या सर्व प्रकरणाची पोलिस अधीक्षक ओला यांनी तत्काळ दखल घेत कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हैदराबादला दुसरा धक्का! मुंबईकडून पहिला सामना खेळणाऱ्या अंशुलने उडवला मयंक अग्रवालचा त्रिफळा

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT