Twenty one crore was received as crop insurance in Shevgaon 
अहिल्यानगर

शेवगावात पीक विम्यापोटी मिळाले साडेएकवीस कोटी

सचिन सातपुते


शेवगाव तालुक्यासाठी साडेएकवीस कोटींचा विमा 
शेवगाव, ता२२ : प्रधानमंत्री पीकविमा योजना अंतर्गत शेवगाव तालुक्यातील कपाशी व ज्वारी पिकासाठी 21 कोटी 36 लाख रुपयांचा विमा मिळाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. मागील वर्षी कपाशी व ज्वारी पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने पीकविमा मिळावा याकरीता शेतकऱ्यांची मोठया प्रमाणावर मागणी होती. त्यासंदर्भात वेळोवेळी संबधित विमा कंपनी तसेच शासनास पाठपुरावा करावा लागल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले. 


प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत कपाशी  तालुक्यातील 15404 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. 9 कोटी 22 लाख रुपये मिळाले आहेत, तर ज्वारी पिकासाठी 13761 शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनाचा 12 कोटी 13 लाख रुपये मंजूर झाले आहेत. 
या वर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाले. परंतु बहुतेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जोमात असलेले पीक वाया गेले. तूर, कपाशी आदी पिके पाण्यात गेली. सूचनेप्रमाणे केलेल्या पंचनाम्याचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत मिळावे. त्याच प्रमाणे बहुतेक शेतकऱ्यांनी मूग व उडीद यासारखी कडधान्याची पिके केली. परंतु सध्याच्या संततधार पावसामुळे शेंगांना मोड आल्याने शेतकऱ्याची पंचनामा करण्याची मागणी आहे. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागात जास्त प्रमाणात मूग व उडीद पिके असून शेंगांनाच मोड आल्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. 
पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन व संबंधित विभागाला विनंती केली असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. अहमदनगर
संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

लखनौचा कायापालट! ४५ मिनिटांचा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत; पाहा योगींचा 'ग्रीन' प्लॅन!

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा आले २ हजार रुपये! PM मोदींनी जारी केला २२ वा हप्ता; यूपीच्या शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस!

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

SCROLL FOR NEXT