two crore livestock in state are thirsty measures for water Sakal
अहिल्यानगर

राज्यातील दोन कोटी पशुधन तहानलेले; पाण्यासाठी उपाययोजना तोकड्या; पशुपालक जेरीस

राज्यात गाई-म्हशींसह शेळ्या, मेंढ्यांची संख्या ३ कोटी २० लाख १२ हजार आहे. त्यातील साधारण दोन कोटी जनावरांना टंचाईच्या झळा बसत आहेत.

सूर्यकांत नेटके

अहमदनगर : राज्यातील बहुतांश भागांत दुष्काळी परिस्थिती पावसाळ्याच्या तोंडावर तीव्र होत आहे. टंचाईग्रस्त गावांत जनावरांसाठी सरकारी पातळीवर पाणीपुरवठ्याबाबत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.

राज्यात गाई-म्हशींसह शेळ्या, मेंढ्यांची संख्या ३ कोटी २० लाख १२ हजार आहे. त्यातील साधारण दोन कोटी जनावरांना टंचाईच्या झळा बसत आहेत. जनावरांसाठी पाणी मिळविताना दुष्काळी भागातील पशुपालक जेरीस आले आहेत.

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाचे झळा सोसणाऱ्या जिल्ह्यातील महसूल मंडळात शासनाने दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली असून त्या ठिकाणी विविध उपाययोजना करण्याबाबत चार महिन्यांपूर्वीच सुचित्त केलेले आहे. त्यानुसार पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा या संदर्भात विविध उपाय योजना केल्या.

अनेक जिल्ह्यांमध्ये चाऱ्याबाबत नियोजन केल्यामुळे चारा टंचाईवर मात करण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे दिसत आहे. पाणीटंचाई निर्माण झालेल्या राज्यातील दहा हजारांपेक्षा अधिक गावांत कोट्यवधी लोकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.

मात्र जनावरांच्या पाण्यासंदर्भात शासनाकडून फारशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणारे ओढे, तलाव गावातला बाजार तलाव यासह अन्य स्रोत बहुतेक ठिकाणी कोरडे पडलेले आहेत. प्रसंगी जनावरांच्या पाण्याबाबत मात्र भटकंती करावी लागत आहे.

पशुवैद्यकांच्या नियमानुसार मोठ्या जनावरांना साधारणपणे दर दिवसाला ३० लिटर, लहान जनावरांना १५ लिटर तर शेळ्या-मेंढ्या १० लिटर पाण्याच्या गरजेनुसार राज्यात दररोज मोठ्या जनावरांसाठी ५७ कोटी ६२ लाख लिटर, शेळ्या मेंढया व इतर जनावरांना २० कोटी लिटर पाण्याची गरज आहे.

२० व्या पशुगणनेनुसार जिल्हानिहाय पशुधन (गाय, म्हैश, शेळ्या, मेंढ्या व इतर)

नगर ः ३० लाख ४० हजार, अकोला ः ४ लाख २१ हजार, अमरावती ः ९ लाख ८५ हजार, छत्रपती संभाजीनगर ः ११ लाख ३४ हजार, बीड ः १२ लाख ५५ हजार, भंडारा ः ५ लाख ७ हजार, बुलडाणा ः १० लाख ५८ हजार, चंद्रपूर ः ७ लाख १२ हजार, धुळे ः १२ लाख ७१ हजार, गडचिरोली ः ७ लाख ९० हजार, गोंदिया ः ५ लाख ६० हजार,

हिंगोली ः ४ लाख ६६ हजार, जळगाव ः १३ लाख १४ हजार, जालना ः ८ लाख ३० हजार, कोल्हापूर ः १० लाख ६० हजार, लातुर ः ६ लाख ९२ हजार, नागपूर ः ७ लाख ५७ हजार, नांदेड ः ११ लाख, नंदुरबार ः ७ लाख २५ हजार, नाशिक ः १९ लाख १९ हजार, धाराशिव ः ७ लाख ५५ हजार, पालघर ः ३ लख ९० हजार,

परभणी ः ५ लाख ७९ हजार, पुणे ः १९ लाख ८३ हजार, रायगड ः ३ लाख २७ हजार, रत्नागिरी ः ३ लाख १० हजार, सांगली ः १३ लाख ५१ हजार, सातारा ः ११ लाख ८५ हजार, सिंधुदुर्ग ः १ लाख ८७ हजार, सोलापूर ः २२ लाख ८५ हजार, ठाणे ः २ लाख २१ हजार, वर्धा ः ४ लाख ६८ हजाार, वाशीम ः ३ लाख ५२ हजार, यवतमाळ ः १० लाख १३ हजार.

राज्यातील पशुधनाची संख्या

  • गाई : १ कोटी ३७ लाख ७५ हजार ८२१

  • म्हशी : ५४ लख ३२ हजार ०२८

  • मेंढ्या : २६ लाख २३ हजार ७५४

  • शेळ्या : १ कोटी ६२ हजार ८२७

  • इतर : १ लाख १७ हजार ६३०

संगमनेर तालुक्यातील कोरडवाहू शेतकरी दूध व्यवसाय, पशुपालनाला प्राधान्य देत आहेत. आमच्या सावरगाव तळ गावात दर दिवसाला पंचवीस हजार लिटर दुधाचे संकलन होते. यंदा बहुतांश भागांत दुष्काळामुळे पाणीटंचाई आहे. जनावरांच्या पाण्याची उपाययोजना नसल्याने आम्हा पशुपालकांना जनावरांच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

- बाळासाहेब शेटे, दूध उत्पादक, सावरगाव तळ, ता. संगमनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT