shirrampur accident 
अहिल्यानगर

कोरोनाने रोजगार संपवला, म्हणून त्याने स्वतःलाच संपवले, तर श्रीरामपुरात दोघांना मोटारीने

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर-पारनेर ः सुपे औद्योगिक वसाहतीतील सूरज बिल्डकॉन कंपनीच्या कामगाराने रविवारी रात्री वाघुंडे बुद्रुक येथील कंपनी कामगारांच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केली. विनायक कन्हार (मूळ रा. ओडिशा) असे त्याचे नाव आहे.

पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यावर त्याचा मृतदेह मूळ गावी भुटकल नाली (ओडिशा) येथे पाठविण्यात आला.  याबाबत राहुल बबन गाडीलकर यांनी सुपे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, सूरज बिल्डकॉन कंपनीत विनायक कन्हार काम करीत होता.

वाघुंडे येथे कंपनीच्या वसाहतीत तो राहत होता. घरात रात्री दहाच्या सुमारास गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच, सुपे पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. आत्महत्येचे कारण समजले नाही. मात्र, कोरोनामुळे दोन महिन्यांपासून कंपनीचे काम बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच, गावी जाण्यातही अनेक अडचणी येत असल्याने नैराश्‍यातून विनायक याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, स्टीलच्या सळया नेणाऱ्या मालमोटारीला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर प्रभात डेअरीजवळ माहेश्वरी स्टीलसमोर आज सायंकाळी हा अपघात झाला.

अनिल यशवंत निकम (वय 50, रा. देर्डे कोऱ्हाळे, ता. कोपरगाव) व बाळासाहेब यशवंत कोते (वय 57, रा. शिर्डी), अशी मृतांची नावे आहेत. येथील एसटी आगारात कोते हे सहायक वाहतूक अधीक्षक होते, तर निकम हे राहुरी बसस्थानक प्रमुख होते. 
पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीरामपूर एसटी आगारातील काम संपवून सायंकाळी बाभळेश्वरमार्गे दुचाकीवर कोते व निकम शिर्डीकडे जात होते.

संगमनेर रस्त्यावर माहेश्वरी स्टीलसमोर स्टीलच्या सळया भरलेल्या मालट्रकला त्यांची दुचाकी मागून धडकली. याबाबत माहिती मिळताच, शहर पोलिसांसह आगारप्रमुख ऋषिकेश शिवदे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोघांना येथील साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी सांगितले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT