Crime Sakal
अहिल्यानगर

पोटची मुलेच ठरली पित्याचा काळ; शेतीच्या वादातून केली हत्या

सुनिल गर्जे


नेवासे (जि. अहमदनगर) : शेतीच्या वादातून एकाहत्तर वर्षीय शेतकऱ्याची त्याच्याच मुलांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. नेवासे तालुक्यातील कारेगाव येथे शुक्रवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मृताच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून नेवासे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.


लक्ष्मण दादा लोणारे (वय ७१, रा. कारेगाव, ता. नेवासे) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मृताची दुसरी पत्नी सुनीता ऊर्फ शालनबाई लोणारे यांनी नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीत म्हटले आहे, की लक्ष्मण लोणारे यांनी पंधरा वर्षांपूर्वी रांजणगावमध्ये जमीन खरेदी केली होती. पहिली पत्नी चंद्रकलाबाई व मुले भाऊसाहेब, अशोक यांच्यासह ते येथे राहत होते. दरम्यान, पत्नीशी वाद झाल्याने ते पुन्हा कारेगाव येथे राहण्यास आले. २०१५मध्ये त्यांनी आपल्याशी विवाह केला.

दरम्यान, शुक्रवारी (ता. १०) लक्ष्मण लोणारे घोडेगाव येथे गेले असता, त्यांना वडाळा बहिरोबा येथे पहिली पत्नी चंद्रकला भेटली. शेतीचा वाद लवकरात लवकर मिटव, नाही तर तुला संपवून टाकीन, अशी धमकी तिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, आज (शुक्रवारी) पहाटे मृत लक्ष्मण प्रातर्विधीसाठी शेतात गेले, ते परत न आल्याने फिर्यादीने शोध घेतला असता, भाऊसाहेब लोणारे (वय ३२) व अशोक लोणारे (वय ३४) हे मक्याच्या शेतातून पळताना त्यांना दिसले. तसेच, लक्ष्मण लोणारे यांच्या हातावर, डोक्यात व कपाळावर धारदार शस्त्राचे वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले.


नेवासे पोलिसांनी मृत लक्ष्मण लोणारे यांची मुले भाऊसाहेब व अशोक यांना ताब्यात घेतले आहे. माहिती समजताच पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पूर्वीही केली होती मारहाण

पाच वर्षांपूर्वी लक्ष्मण लोणारे यांना चंद्रकलाबाई व तिच्या दोन्ही मुलांनी कारेगाव येथे येऊन शेतीच्या वादातून जबर मारहाण केली होती. हा वाद न्यायालयात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Indrayani Express: इंद्रायणी एक्सप्रेस बालकासाठी थांबली; वेळेवर उपचाराने जीव वाचला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

SCROLL FOR NEXT