Construction work esakal
अहिल्यानगर

श्रीगोंदे पालिकेचे दोन प्रकल्प धूळखात

संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सात वर्षांपुर्वी नगरपालिकेने साठ लाखांच्या कामास प्रारंभ केला. मात्र, या केंद्राच्या केवळ भिंतीच उभ्या राहिल्या आणि ज्या जागेवर अभ्यासिका उभारली जात आहे. ती जागा खुल्या क्रिडांगणासाठी आरक्षित असल्याची तक्रार झाली आणि हे काम बंद पडले. त्याच्याच लगत एक कोटी तीन लाख खर्चाच्या क्रीडासंकुलाचे काम तीन वर्षांपुर्वी सुरु झाले. मात्र, तेही मुदत संपली तरी अपुर्ण आहे.

काम बंद करण्याची नामुष्की

शहरातून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यालगत असणाऱ्या जागेत पालिकेने २०१२ मध्ये अभ्यासिका केंद्राचे काम हाती घेतले. त्यावेळी त्या कामासाठी ५९ लाख ३७ हजार खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले होते. स्पर्धा परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे मार्गदर्शन, पुस्तकांसह इतर साहित्य मोफत देण्यात येणार होते. दरम्यान, ज्या ठिकाणी ही इमारत उभी राहत होती ती जागा खुल्या क्रिडांगणासाठी आरक्षीत असून पालिकेने कुठलीही मंजूरी न घेता हे बांधकाम सुरु केल्याची तक्रार झाली. पालिकेला त्यावर समाधानकारक उत्तर देता न आल्याने शेवटी केवळ भिंती उभ्या ठेवून हे काम बंद करण्याची नामुष्की आली.
दरम्यान, तीन वर्षांपुर्वी या अभ्यासिका केंद्राच्या बंद असणाऱ्या बांधकामालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत एक कोटी ३ लाख रुपयांचे क्रिडासंकुल उभारणीचे काम सुरु झाले. या क्रिडासंकुलात खेळाचे मैदान, इनडोअर स्टेडियम, बॅडमिंटन कोर्ट, पोहण्याचा तलाव आदी सुविधा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. याही कामाच्या भिंती बांधण्यात आल्या. मात्र, त्यानंतर मुदत संपुनही काम अपुर्ण अवस्थेत आहे.

पावणेदोन कोटीच्या कामांचे केवळ सापळे

पालिकेच्या म्हणण्यानूसार क्रिडासंकुलाच्या जागेत काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यांना हटविल्याशिवाय क्रिडासंकुलाचे काम पुर्ण करता येत नाही. दरम्यान, या दोन्ही प्रकल्पाबाबत पालिकेचा अभ्यास किती कच्चा होता हे बंद पडलेल्या कामावरुन दिसून येते. चुकीच्या जागेत अभ्यासिका उभी करताना कुठेतरी प्रशासनाने वरिष्ठांशी चर्चा करायला हवी होती. त्यातच क्रिडासंकुल उभारणीपुर्वीच तेथील जे अतिक्रमण आहे ते का काढले नाही याचेही उत्तर कुणाकडे नाही. ही जबाबदारी पालिकेची होती. त्यात ते कमी पडल्याने या पावणेदोन कोटीच्या कामांचे केवळ सापळे उभे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती, कमळाला हाताचा आधार; शिवसेना शिंदे गट विरोधी बाकावर

एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी! राज्यात ९००० शिक्षकांची भरती; मे २०२६ पर्यंतची रिक्त पदे भरणार; पवित्र पोर्टलद्वारेच भरती प्रक्रिया; ‘टीईटी’चा निकाल याच महिन्यात

फलटण तालुका हादरला! सस्तेवाडीत मध्यरात्रीत एकाचा खून; दोघांना अटक, शेतात ससे पकडण्यास गेला अन् काय घडलं?

आजचे राशिभविष्य - 07 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT