corona 19 
अहिल्यानगर

शहरातील दोन ठिकाणे झाली कंटेन्मेंट झोन 

अमित आवारी

नगर : शहरातील आयटीआय कॉलेजसमोरील नंदनवन कॉलनी व नालेगाव परिसरातील बागरोजा हडको या दोन भागांत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यामुळे महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला. हा परिसर 24 जुलैपर्यंत "सील' करण्यात आला. या परिसरात उद्या (रविवार) पासून सकाळी महापालिका प्रशासनाकडून सशुल्क जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्यात येणार आहेत. 

नंदनवन कॉलनी कंटेन्मेंट झोन झाल्याने चाणक्‍य चौक, स्वाती कॉलनी, हॉटेल वैभव परिसर, डॉ. शिंदे हॉस्पिटल परिसर, राष्ट्रीय पाठशाळेच्या पाठीमागचा परिसर, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय व आयटीआय कॉलेज परिसर बफर झोन झाला. त्यामुळे या परिसरात केवळ जीवनावश्‍यक वस्तूंचीच दुकाने खुली राहणार आहेत. बागरोजा परिसर कंटेन्मेंट झोन झाल्यामुळे सातभाई मळा, विद्याविहार कॉलनी, गृहशिल्प सोसायटी, बागरोजा हडकोचा पश्‍चिमेचा परिसर, दातरंगे मळा, महापालिकेचे संभाजी महाराज व्यापारी संकुल परिसर, नालेगाव म्युनिसिपल हडको परिसर बफर झोन झाला आहे. 

शहरातील तोफखाना, सिद्धार्थनगर, पद्मानगर परिसरही सध्या कन्टेन्मेंट झोन आहे. जिल्ह्यात काल (शनिवारी) 90 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून 50 पेक्षाही जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहर बंद करण्याची तयारी सुरू केली असल्याची चर्चा शहरात आहे. शहरात सध्या दिवसा सोशल डिस्टन्सचा फज्जा उडविला जात आहे. शहरातील विविध चौकांत भाजीविक्रेते बसतात. हे भाजीविक्रेते सोशल डिस्टन्सचा पालन करत नाहीत. त्यांच्याकडे येणारे ग्राहकही सोशल डिस्टन्सचे पालन करत नसल्याने महापालिकेकडून बऱ्याच वेळा त्यांच्यावर कारवाई केली आहे. शहरातील मोठ्या दुकानांतही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : तृणमूल काँग्रेसच्या नाव-चिन्हावरून वाद; ममता बॅनर्जी गटाकडून तीन पर्याय सादर, निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही तीव्र आक्षेप

Uddhav Thackeray: ५ ऑक्टोबरचा पंचनाम्यांचा मुहूर्त कशासाठी? दुष्काळावरून उद्धव ठाकरे आक्रमक; महाराष्ट्र पिंजून काढण्याची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! ब्लॉकमुळे ४ लोकल रद्द, दोन दिवस कल्याण-कसारा सेवा बंद; रेल्वे वेळापत्रकात मोठे बदल

Marathi News Live Updates : राज्यात 20 ते 25 सप्टेंबरदरम्यान पुन्हा पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला अंदाज

तिरडीवरचा अबीर गुलाल पाहून मी... अलका कुबल यांनी सांगितली 'माहेरची साडी'बद्दलची आठवण, म्हणाल्या- स्वतःचं मरण

SCROLL FOR NEXT