Two policemen beaten in Kukane in Nevasa taluka 
अहिल्यानगर

नगर जिल्ह्यात दोन पोलिसांना लाकडी दाडक्याने मारहाण; एकाला अटक

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करत असताना विनामास्क सापडलेल्या व्यक्तीने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. हा गंभीर प्रकार कुकाणे (ता. नेवासे) येथे मंगळवारी घडला आहे. दरम्यान दारूच्या नशेत तरर्र मै हू 'डॉन' म्हणणाऱ्या या संशयित आरोपीला पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

साथरोग नियंत्रण कायदा आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात नेवाशाचे प्रभारी परिविक्षाधीन सहाय्य पोलिस अधीक्षक अभिनव त्यागी यांच्या नेतृत्वाखाली नेवासे पोलिसांनी कारवाईची जोरदार मोहीम तालुक्यात राबवित आहेत. दरम्यान मंगळवारी (ता. २४) या प्रकरणातील फिर्यादी व कुकाणे येथील पोलिस दुरक्षेत्रात कार्यरत असलेले वाहातुक पोलिस कर्मचारी अमोल बुचकुल व पोलिस नाईक किशोर काळे, पोलिस शिपाई गणेश गलधर, नितीन भाताने, आंबादास गीते हे शेवगाव- नेवासे रस्त्यावर कुकाणे येथे वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई करत होते.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी बुचकुल यांना प्रकाश उर्फ बाळु मारुती साळुंके (वय ४२, राहणार कुकाणे, ता. नेवासे) हा तोंडाला मास्क न लावता रोडने पायी फिरतांना दिसला. त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई करत असतांना साळुंके याने  बुचकुल यांना शिवीगाळ करुन तेथुन पळ काढला. दरम्यान काही वेळाने हातात लाकडी दांडा घेऊन आला व  पोलिसांना मोठमोठ्याने शिवीगाळ करु लागला.

पोलिस त्याला समजावुन सांगत असतांनाच त्याने बुचकूल व  कॉन्स्टेबल गणेश गलधर यांनाही लाकडी दांड्याने मारहाण केली.
दरम्यान नेवासे पोलिसांत पोलिस कॉन्स्टेबल अमोल दत्तात्रेय बुचकुल यांच्या फिर्यादीवरून प्रकाश उर्फ बाळु मारुती साळुंके याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

'डॉन'चा आवाज 'डाऊन झाला'..!
पोलिस कारवाई करते वेळी आरोपी प्रकाश साळुंके पोलिसांना शिवीगाळ करत "तुम्ही मला ओळखत नाही, मी कुकाणे गावचा 'डॉन' असुन माझ्या नादी लागलात तर तुमचा एक- एकाचा काटा काढीन, अशी धमकी देत होता. मात्र पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच 'डॉन' डाऊन झाला. पोलिसांशी काहीसा नारमाईने बोलू लागला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी दिवस- रात्र धडपडणाऱ्या  पोलिसांच्याच जीवावर उठायचे हा प्रकार दुर्दैवी आहे. अशांवर कडक कारवाई झालीच पाहिजे.
- भैरवनाथ भारस्कर, राज्य प्रमुख, महाराष्ट्र लहुजी सेना 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Update: ट्रम्प यांनी शांतता करार नाकारल्यानंतर कच्चे तेल महागले! देशात नवे इंधन दर; पाहा पेट्रोल-डिझेल-CNG कितीला

Pune News: एसटीच्या २५ हजार बस रस्त्यातच बंद; गेल्या चार महिन्यांतील स्थिती, पाच हजार बसची स्थिती अत्यंत खराब

Thane Crime: ठाण्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; प्रसिद्ध अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ, दोन मुलींची सुटका

Maharashtra Drought Relief : दुष्काळ जाहीर; मदतीचे निकष गुलदस्त्यात! कृषी विभागाला आदेशाची प्रतीक्षा ; जुन्या निकषांबाबत संभ्रम

Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

SCROLL FOR NEXT