ahmednagar sakal
अहिल्यानगर

अहमदनगरमध्ये दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

अहमदनगरसह पुणे जिल्ह्यातील दहा दुचाकी हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अहमदनगर व पुणे जिल्ह्यांतून दुचाकी चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. आरोपी सागर सुदाम जाधव (वय २७), महेश ऊर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडे (वय २२, दोघे रा. बहीरवाडी, बायजाबाई जेऊर, ता. नगर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून सात लाख ८७ हजार रुपये किमतीच्या, चोरलेल्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अशोक नारायण जाधव (वय ४७, रा. शंकरनगर, ता. पाथर्डी) यांनी घरासमोर लावलेली दुचाकी (एमएच १६ बीई ४४९७) चोरीला गेली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना सागर जाधव (रा. बहीरवाडी, ता. नगर) याने व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने बहीरवाडी येथे जाऊन आरोपी जाधवला ताब्यात घेतले. महेश दारकुंडे व गौतम पाटील या साथीदारांची नावे त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी महेश ऊर्फ सुनील बाबासाहेब दारकुंडेला ताब्यात घेतले. गौतम पाटील मात्र सापडला नाही. पाथर्डी पोलिस ठाण्याचे हवालदार भगवान सानप तपास करीत आहेत.

आरोपींचे पाथर्डी पोलिसांकडे हस्तांतर

आरोपींनी पाथर्डी, अहमदनगर, तसेच पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी, शिरूर, शिक्रापूर येथून दुचाकी चोरल्याचे सांगितले. त्यातील विविध कंपन्यांच्या सात लाख ८७ हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी काढून दिल्या. आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रणबीर कपूरच्या 'रामायण' चा टीझर रिलीज; श्रीरामांच्या भूमिकेत अभिनेता शोभतोय का? प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? वाचून आश्चर्य वाटेल

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

SCROLL FOR NEXT