अहमदनगर : एक्सलन्स इन्स्टिट्यूट उभारू - उदय सामंत sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : एक्सलन्स इन्स्टिट्यूट उभारू - उदय सामंत

तरुणांना स्वयंरोजगारासाठी मिळणार प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका : शिक्षणपद्धतीत मोठे बदल होत आहेत. आगामी काळात जिल्ह्यातील शिक्षितांना स्वयंरोजगार निर्माण होण्यासाठी ३० कोटी रुपये खर्चून सेंट्रल एक्सलन्स इन्सि्टट्यूट उभारली जाईल, असे मत उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

अहमदनगर शहर व नगर तालुका युवा सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर होते, तर व्यासपीठावर शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, नगर पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, प्रवीण कोकाटे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, युवा तालुका प्रमुख प्रवीण गोरे होते. आज जिल्हा शिवसेनाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

मंत्री सामंत म्हणाले, की शिवसेनेत व्यक्तीपेक्षा पक्षाला महत्त्व दिले जाते. मी मंत्री जरी असलो, तरी प्रथम शिवसैनिक आहे. कार्यक्रमात शिवसैनिकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी विचारल्या पाहिजेत. शहर व तालुक्यातील युवा वर्गासाठी ३० कोटी रुपये खर्चून सेंट्रल एक्सलन्सची उभारणी करण्यात येईल. त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी या इन्स्टिट्यूटची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

गाडे म्हणाले, की युवा शक्ती ही जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद आहे. त्याबरोबरच गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांचीही त्यांना चांगली साथ मिळत आहे. जो संघटनेत चांगले काम करील, त्याला पक्ष अधिकाअधिक जबाबदारी देत आहे.

कोरगावकर म्हणाले, की नगर जिल्हा हा साखर व शिक्षणसम्राटांचा जिल्हा आहे. या सम्राटांपुढे आमचा शिवसैनिक तग धरून उभा आहे. सर्वसामान्य शिवसैनिक पक्षाची प्रमुख ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वागत राजेंद्र भगत यांनी, प्रास्ताविक प्रकाश कुलट यांनी केले. आभार प्रवीण गोरे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

SCROLL FOR NEXT