Uddhav Thackeray 
अहिल्यानगर

Uddhav Thackeray: "शासन आमच्या दारी आलं पण काहीही दिलं नाही"; शेतकऱ्यांनी ठाकरेंकडं मांडल्या व्यथा

पिण्याचं पाणी, चाऱ्याचा, रोजगाराच प्रश्नांवर शेतकऱ्यांनी मांडली भूमिका

Amit Ujagare (अमित उजागरे)

नगर : शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सध्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, पुणतांबा या भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी काकडी गावातील शेतकऱ्यांशी संवादही साधला. शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यंदा पाऊसही कमी असल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. (Uddhav Thackeray Visit to Ahmednagar Districts Sarkar Aplya Dari Programme Farmers raised issues)

शेतकऱ्यांनी ठाकरेंना काय सांगितलं?

शेतकऱ्यांनी म्हटलं, "१८२ गावांमध्ये कुठेच पाणी नाही. सायाबीनचं पिक पूर्णपणे करपून गेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकारनं असताना इथल्या गावांसाठी १,००० कोटींचा निधी मिळाला होता. पण त्यानंतर काहाही मिळालेलं नाही. मजूरांना कामं नाहीत, जॉईन्ट खातं असल्यामुळं सरकारी मदतीचा काहीही फायदा मिळत नाही. त्याचबरोबर पिण्यासाठी देखील आम्हाला पाणी विकत घ्यावं लागत आहे. जनावरांना चाऱ्यासाठी ऊसही नाही, खाटिकही जनावरांना घेत नाही. गावात प्यायलाही पाणी नाही" (Latest Marathi News)

महिलांनी मांडल्या समस्या

तसेच काकडी गावातील काही महिलांनी देखील ठाकरेंना इथल्या समस्या सांगितल्या. त्यांनी सांगितलं की, "आमच्या गावात विमानतळ झालं. हे विमानतळ येणार असल्यानं आम्हाला खूप आश्वासनं दिली गेली, त्यासाठी १५०० एकर जमीन कवडीमोल भावात घेतल्या. आमच्या गावात प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाही. (Marathi Tajya Batmya)

आम्हाला जर तातडीनं कर मिळाला तर आम्ही गावात शाळा, लाईटची व्यवस्था करु शकतो. आम्ही मंत्रालयात जाऊन सर्व मंत्र्यांना निवेदनं दिली आहेत. ३० कोटी रुपये खर्चुन आमच्या गावात 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रम केला गेला. आमच्याच जमिनीवर उभं राहून कार्यक्रम केला पण आमची भेटही घेतली नाही, असा आरोपही यावेळी या महिलांनी केला"

यावर विरोधीपक्ष नेते अंबादास विधीमंडळात आवाज उठवतील तसेच आपण रस्त्यावर आवाज उठवू यात मी स्वतः लक्ष घालेन असा दिलासा उद्धव ठाकरेंनी त्यांना दिला.

सरकारी कर्मचाऱ्यांना केल्या सूचना

यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारी कर्मचाऱ्यांना काही सूचनावजा सवालही केले. पिक विम्याचे गेल्यावर्षीचे २४ कोटी रुपये काही जणांना मिळाले काहींना मिळाले नाही, याबाबत त्यांनी या कर्मचाऱ्यांकडं विचारणा केली.

तसेच लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा सोडवायला हवा अशी अपेक्षा त्यांनी या कर्मचाऱ्यांकडं व्यक्त केली. दरम्यान, या परिसरात आपण पुन्हा दौरा करणार असून तोपर्यंत कोणीही धीर सोडू नये, अशा शब्दांत ठाकरेंनी इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT