drone esakal
अहिल्यानगर

....अन् सुतारवाडीत अचानक उतरले अज्ञात ड्रोन! नागरिकांत भिती

मार्तंड बुचुडे

पारनेर (जि.अहमदनगर) : तालुक्यातील सुतारवाडी (ढवळपुरी) परीसरात एक अज्ञात ड्रोन आज (ता.७)अचानक उतरले. याबाबत कोणालाच काही माहीत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मात्र भितीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी नागरीकांना या ड्रोन पासून दूर रहावे कोणीही त्याच्या जवळ जाऊ नये असे आवाहन केले आहे. या घटनेमुळे नागरिक मात्र चांगलेच संभ्रमात पडले....

....अन् सुतारवाडीत अचानक उतरले अज्ञात ड्रोन!

याबाबत माहिती अशी की, आज (ता. ७ ) सायंकाळच्या सुमारास सुतारवाडी परिसरात एक अज्ञात ड्रोन उतरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. हे ड्रोन नेमके कोणाचे असावे? यात काही धोकादायक तर काही नसेल ना? या सर्व शंकांनी नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते. मात्र नेमके हे ड्रोन कोणी सोडले असावे? त्यात काय आहे त्यात काही स्फोटक तर नसेल ना? अशा प्रकारच्या शंका व अफवा परीसरात पसरविण्यात आल्या . या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी लष्करी अधिका-यांना कळविल्यानंतर लष्कारीचे अधिकारी मेजर भगिंदरसिंग हे त्या ठिकाणी आले व ते हे ड्रोन घेऊन गेले आहेत. हे ड्रोन लष्कराचेच असावे असा अंदाज उपस्थीतांनी व्यक्त केला आहे. ड्रोन अचानक उतरल्याचे समजल्या नंतर सुतारवाडी परीसरात काही काळ दहशतीचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर लष्करी अधिकारी येऊन ते घऊनही गेले. त्या नंतर मात्र परीसरातील नागरीकांनी सुस्कारा सोडला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, काय म्हणाले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री?

Mumbai Local Megablock: महिन्याचा शेवटचा रविवार त्रासदायक! लोकल उशिराने धावणार; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : पोर्टलवर खताचा साठा भरपूर, पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संकटात

ते इतके चांगले होते की पहिल्याच सीनला... सायलीच्या सासूबाईंनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम करण्याचा अनुभव

हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारणारी व्यक्ती केवळ ‘मुस्लिम’ राहते, High Court ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT