Unpleasant act done by the doctor in the ambulance 
अहिल्यानगर

चहाटळ डॉक्टर ः १०८ रूग्णवाहिकेत पेशंटच्या नातेवाईक महिलेसोबत घडला ओंगळवाणा प्रकार

सकाळ वृत्तसेवा

नेवासे : डॉक्टरला देव मानले जाते. परंतु एका डॉक्टरने त्या नात्याला काळिमा फासला आहे. पेशंटला रूग्णवाहिकेतून नेत असतानाच त्या डॉक्टरने ते कृत्य केले.

नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेत कार्यरत असणाऱ्या डॉक्टरने  रुग्णवाहिकेत रुग्णाला नगर येथे घेऊन जास्त असतांना रुग्णाच्या नातेवाईक महिलेसोबत अश्लिल चाळे केले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून नेवासे पोलिसांत डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

या बाबत माहिती अशी, "पीडित महिलेची गर्भवती सूनेस रक्तदाबाचा त्रास होत असल्याने तिला नेवासे फाटा येथील रुग्णालयात  दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्या महिलेस पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यास सांगितले. 

दरम्यान, पीडित महिलेसह तिचा पती त्यांची पुतणी हे सुनेसह   गुरुवारी रात्री दहा वाजता नेवासे फाटा येथील १०८ रुग्णवाहिकेने नगरला जात असताना नेवासे फाटा ते नगर दरम्यान या रुग्णवाहिकेत कार्यरत असलेल्या डॉक्टरने अश्लिल चाळे सुरू केले. विशेष म्हणजे त्या रूग्णवाहिकेत तिचा पतीही होता. तरीही डॉक्टरने हे कृत्य केले. घटनेवेळी संबंधित महिला घाबरलेली होती. त्यामुळे तिने आज नेवासे पोलिसांत तक्रार दिली. 

नेवासे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा सरकारला कडक इशारा! दोषमुक्तीच्या याचिकांवर विलंब केला तर थेट अवमान कारवाई... इतर राज्यांना संदेश

Washim News: सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाची एन्ट्री;जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; दिग्गजांना हादरा

Latest Marathi News Live Update : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेची सर्व तयारी पूर्ण; उद्या मुख्य यात्रा

Pimpri News: अपघात आणि बेपत्ता नोंद एकाच पोलीस ठाण्यात, तरी तपासाची तसदी घेतली नाही; CRPF जवानाच्या मृत्यूचा ५ दिवसांनी उलगडा..

Buldhana News: तहसीलदारावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न; रेतीमाफियांची मुजोरी वाढली; सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले वाहन

SCROLL FOR NEXT