Vegetable sellers angry with Sangamner Municipality
Vegetable sellers angry with Sangamner Municipality 
अहमदनगर

व्यवसाय करतात भाजीवाले, कमाई होते पालिकेची

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः ""तीन तासांत भाजी विकून मिळतात 500 रुपये.. त्यातील पालिकाच नेते 100 रुपये.. आम्ही करायचं तरी काय?..'' शेतकऱ्यांचा हा सवाल सोशल मीडियावर फिरत आहे. त्याला कारणही तसेच आहे. प्रशासनाने दिलेल्या वेळेत भाजीविक्रेत्यांकडून पालिकेच्या दैनंदिन करवसुली करणाऱ्या ठेकेदाराने मनमानी पद्धतीने वसुली सुरू केल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. 

कोरोनामुळे देशभर लॉकडाउन करण्यात आले. नागरिकांना जीवनावश्‍यक गरजांसाठी रोज दुपारी 12 ते 3 या वेळेत सूट देण्यात आली. या काळात शहर परिसरातील शेतकरी अर्थार्जनासाठी ताजा भाजीपाला घेऊन शहरातील रस्त्यांवर बसतात.

काही किरकोळ विक्रेते सकाळी ठोक बाजारातून भाजीपाला खरेदी करून, ठरवून दिलेल्या जागी बसतात किंवा हातगाडीवर फिरून ग्राहकांची गरज भागवतात. लॉकडाउनच्या काळात शेतकरी व शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून दैनंदिन करवसुली न करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.

महिनाभर त्याची अंमलबजावणीही झाली. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ठेकेदाराने 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत वसुलीला सुरवात केली आहे. त्यामुळे तीन तासांत थोडी-फार कमाई करणारे विक्रेते नाराज झाले आहेत. तसेच, वसुली कर्मचारी अरेरावी करीत असल्याचा आरोपही होत आहे. 

सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त होत आहेत. पालिकेच्या या करवसुलीची सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. शेतमालाला उठाव नसल्याने दर कमी मिळतो. त्यात पालिकेच्या करवसुलीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. याबाबत फेरविचार करण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे. 

पालिकेच्या उत्पन्नाच्या स्रोतात दैनंदिन कराचा समावेश आहे. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन काळात कर न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या महिन्यात पालिकेला सुमारे पाच ते सहा लाखांचा फटका बसला. आता विक्रेत्यांची संख्या वाढल्याने, नियमाप्रमाणे करवसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- डॉ. सचिन बांगर,

मुख्याधिकारी, संगमनेर नगरपालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT