The vehicles caught in the sand theft will be auctioned on January 21 
अहिल्यानगर

वाळूचोरीत पकडलेल्या वाहनांचा २१ जानेवारीला होणार लिलाव

विलास कुलकर्णी

राहुरी : वाळूचोरी प्रकरणात महसूलच्या पथकाने जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी मालक फिरकत नाहीत. अशा वाहनांचे लिलाव करून थकबाकीच्या वसुलीचा निर्णय तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी घेतला आहे.

त्यानुसार, 21 जानेवारीला सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात दंडात्मक थकबाकीच्या 9 लाख 86 हजार 908 रुपये वसुलीसाठी नऊ वाहनांचे लिलाव होणार आहेत. 

तालुक्‍यातील मुळा व प्रवरा नद्यांतून अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना पथकाने 9 वाहने पकडली. त्यांत एक ट्रॅक्‍टर व ट्रॉली, एक डंपर व 7 टेम्पोंचा समावेश आहे. त्यांच्याकडे 9 लाख 86 हजार 908 रुपयांची थकबाकी आहे.

मात्र, जप्त वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कारवाई आदेशातील रक्कम शासनजमा केलेली नाही. या वाहनांचा लिलाव करून रक्कम वसूल केली जाणार आहे, असे तहसीलदार शेख यांनी सांगितले. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT