vahane japt.jpg 
अहिल्यानगर

जप्त वाहनांचा लिलाव; 40 लाख रुपये जमा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अवैध गौणखनिज वाहतूक करताना महसूल विभागाने जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावली होती. ज्या मालमांनी दंड भरला नाही, त्यांच्या वाहनांचा तहसील कार्यालयात लिलाव करण्यात आला. महसूल प्रशासनाने 28 वाहनांबाबत उद्‌घोषणा केली होती. त्यानंतर सहा वाहनचालकांनी 15 लाख 20 हजार रुपये एका दिवसातच जमा केले. उर्वरित 22 वाहनांचा लिलाव करण्यात आला. त्यातून 24 लाखांचा महसूल जमा झाला. अशा प्रकारे एकूण 40 लाख 47 हजार रुपये महसूल जमा झाला. 

प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार अभिजीत बारवकर, कोतवाल आकाश करपे, देवेंद्र परदेशी यांनी लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अशाच प्रकारे लिलाव करणार असल्याचे तहसीलदार पाटील म्हणाले. राज्य शासनाने महसूल विभागाचे वसुलीचे लक्ष दीडपट वाढविले आहे. वसुलीसाठी प्रशासन वेगवेगळ्या कल्पना राबवित आहे. नगर तहसील कार्यालयास 33 कोटी 6 लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रशासनाने जप्त वाहनांचा लिलाव करण्यास सुरवात केली आहे. त्यातून अवैध व्यावसायिकांनाही चाप बसणार आहे. 

नगर तहसीलसाठी गेल्या वर्षी 24 कोटींचे उद्दिष्ट होते. यंदा ते 33 कोटी 6 लाख रुपये आहे. आतापर्यंत 19 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, दिलेल उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत. 
- उमेश पाटील, तहसीलदार, नगर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT