Vikhe Patil said, BJP-Shiv Sena alliance in the future ... raised eyebrows of the people
Vikhe Patil said, BJP-Shiv Sena alliance in the future ... raised eyebrows of the people 
अहमदनगर

विखे पाटील म्हणाले, भविष्यात भाजप-शिवसेना युती...लोकांच्या उंचावल्या भुवया

सतीश वैजापूरकर

राहाता ः कही पे निगाहे, कही पे निशाना हा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकारणाचा स्थायीभाव आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या उदघटनानिमित्त काल त्यांनी शहरात कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यास निमंत्रित म्हणून शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी हजेरी लावली. विखे पाटील चांगले प्लॅनर आहेत, असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर विखे पाटील यांच्या डोक्यात नेमका काय प्लॅन असावा, असा प्रश्न उपस्थीतांना पडला. 

या कार्यक्रमात विखे पाटील म्हणाले, तुम्ही युतीचे खासदार म्हणून निवडून गेलात. आता महाविकास आघाडीचे खासदार झालात. हरकत नाही, कुणी सांगावे, आपली पुन्हा युतीदेखील होईल. त्यांच्या या विधानमुळे उपस्थितांच्या भुवया पुन्हा उंचावल्या. 

कोविडमुळे अर्थकारण थंडावले, राजकारण नाही. एरवी फारसे एकत्र न येणारे हे दोन नेते अनपेक्षितपणे एकत्र आले. त्यामागे काही तरी कारण असणार. आजवरचा अनुभव पहाता विखे पाटील विनाकारण काहीही करीत नाहीत. 

लोखंडे यांनी विखे पाटील यांच्या उल्लेख चांगले प्लॅनर असा केला. श्रीरामपूर नगर पालिकेची निवडणुक वर्षभरावर आली. त्यामुळे त्यांनी सोंगट्या टाकायला सुरवात केली नाही ना. लोखंडे यांचे या पालिकेच्या राजकारणात फारसे स्थान नाही. बोलणी करायची वेळ आली तर शिवसेनेपूरती त्यांची भुमिका महत्वाची ठरू शकते एवढेच. विखे पाटील यांची श्रीरामपूर शहर व मतदारसंघावर बारीक नजर आहे. तेथे त्यांना एका दगडात दोन तीन पक्ष्यांची शिकार करायची आहे. 

अहोरात्र राजकारण हा विखे पाटील परिवाराचा स्थायीभाव आहे. एकाच वेळ अनेक आघाड्यावर लढाई सुरू ठेवण्याची क्षमता आणि ताकद त्यांच्याकडे आहे. इकडे शिवसेनेचे लोखंडे त्यांच्या व्यासपिठावर येतात. त्याचवेळी राहूरीचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील दिल्लीला जातात. फुरसतीच्या काळात डॅमेज कंट्रोल आणि बेरजेचे राजकारण करायचे. गरजेच्या वेळी त्याचा फायदा होऊ शकतो. किमान त्यात तोटा काही नसतो. 

खासदार लोखंडेंच्या मनात काय शिजतंय

लोखंडे हे दोन वेळा लाटेवर स्वार होत खासदार झाले. मतदारसंघातील प्रस्थापितांच्या राजकारणात डोकवायचे नाही. गट बांधणी करून संघर्ष करायचा नाही. ही त्यांची काम करण्याची पध्दत आहे. त्यामुळे त्यांची प्रस्थापितांना अडचण होत नाही. त्यांनाही आपल्या चिरंजिवांना श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून आमदार करण्याची इच्छा आहे. उद्या राज्यात खरोखरच राजकीय समीकरणे बदलली. तर विखे पाटील यांचा आधार कुणाला नको आहे. असा व्यवहारी विचार करून त्यांनी कालच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले असणार. नाही म्हणायला, आम्ही विकासकामाच्या निमित्ताने एकत्र आलो. यात राजकारण नाही. असे सांगायला लोखंडे विसरले नाहीत. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT