राहाता ः पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. भरपाईसाठी आपण राज्य सरकारसोबत भांडू. महाविकास आघाडीचे मंत्री मात्र गप्प आहेत. जनतलेला कंगना नव्हे, तर कोरोना महत्त्वाचा वाटतो. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड रुग्णसंख्या वाढीचे संकेत दिले आहेत.
खासगी कोविड रुग्णालयांवर सरकारचे नियंत्रण नाही. शिर्डी विधानसभा मतदारसंघात कोविड उपचार व्यवस्था अन्य तालुक्यांच्या तुलनेत फार चांगली असल्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यावर अधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत विखे पाटील बोलत होते. प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंद सदाफळ, सभापती नंदा तांबे, शिर्डीच्या नगराध्यक्ष अर्चना कोते, ऍड. रघुनाथ बोठे, वाल्मिक गोर्डे आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, ""तालुक्यात 25 ग्रामपंचायतींवर प्रशासक आले. प्रशासकांनी कार्यकर्ते, तलाठी व ग्रामसेवकांसोबत समन्वय ठेवून कोविडबाबतची कामे करावित. जादा पावसामुळे झालेल्या नुकसान झाले असून, त्याच्या भरपाईसाठी राज्य सरकारकडे पाठपूरावा करू. वेळप्रसंगी भांडू. ओढ्या-नाल्यावरील अतिक्रमणांमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखी भर पडली. ही अतिक्रमणे अधिकाऱ्यांनी तातडीने दूर करावीत.''
शिर्डी विधानसभा मतदारसंघात कोविड नियंत्रणाची व्यवस्था चांगली आहे. लोणी व नगर येथील विळद घाट येथे कोविड रुग्णालय सुरू केले. शिर्डी येथेही आजपासून कोविड रुग्णालय सुरू झाले. सवलतीच्या दरात कोविड चाचण्या केल्या. अन्य मतदारसंघातील स्थिती पाहता, शिर्डी मतदारसंघाची स्थिती खूप चांगली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
संपादन - अशोक निंबाळकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.