ahmedmagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : विखे उचलणार वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च

उपचारांची घेतली माहिती : मुख्यमंत्री सहायता निधीतूनही देणार मदत

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर दिंडीला झालेल्या अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च उचलण्याची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली, तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदतीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या, तसेच जखमींच्‍या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून घेतली.

साईबाबा पालखीला संगमनेर तालुक्यातील एकोणीस मैल परिसर घाटानजीक काल अपघात झाला. राहाता तालुक्यातील कनकुरी येथील भाऊसाहेब नाथा जपे, कोऱ्हाळे येथील ताराबाई गमे, शिर्डी येथील बबन थोरे आणि कोपरगावचे बाबासाहेब गवळी या चार वारकऱ्यांचा त्यात मृत्यू झाला.

जखमी वारकऱ्यांना संगमनेर येथील कुटे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मंत्री विखे पाटील यांनी सर्व जखमी व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह स्थानिक अधिकारी रुग्णालयात थांबून होते. मंत्री विखे पाटील यांनीही उपचारांची माहिती डॉक्टरांकडून घेतली.

जखमींच्या सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही रुग्णांना घरी सोडण्यात आले. इतर रुग्णांवर उपचार सुरू असून, आजही मंत्री विखे पाटील यांनी जखमींच्या उपचारांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली, तसेच रुग्णांवर कोणताही आर्थिक भार येऊ देऊ नका.

उपचाराचा सर्व खर्च आपण उचलू, असे सांगत त्यांनी जखमींच्या कुटुंबांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतूनही जखमींना मदतीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याबाबत त्यांनी प्रशासनास सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT