In this village in Pathardi, there is a fear of corona disease 
अहिल्यानगर

कोरोनामुळे पाथर्डीतील हे गाव पुरतं भेदरलंय

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : बसचालकाला कोरोनाची बाधा झाल्याने चेकेवाडीचे ग्रामस्थ भेदरले आहेत. मुंबई येथे गेलेले बसचालक गावात आले नाहीत. मात्र, तरीही मनात अनामिक भिती आणि आरोग्य व महसुल विभागाने केलेली चौकशी यामुळे गावातील नागरीक व महिला निशब्द झाले आहेत.

गावात कोणी नवीन आले तर ग्रामस्थ कावरे-बावरे होतात. शासनाचे वाहन दिसले तर मग तर काळजात धस्स होते. तहसीलदार नामदेव पाटील यांनी चौदा दिवसासाठी चेकेवाडी गाव सील करण्याचे आदेश बजावले आहेत.

चेकेवाडी येथील 34 वर्षीय युवक मुंबई येथे एसटी चालकाचे काम करतात. लाँकडाऊनमधे ते गावी चेकेवाडी येथे होते. आठ जून 2020 रोजी मुंबई येथे कामावार हजर होण्यासाठी गेले. तेथे कर्तव्यावर असताना त्यांच्या काही सहका-यांना कोरोनाची बाधा झाली.

ते जेथे राहत होते तेथेही जवळच्या मित्रांना कोरोनाची बाधा झाली. बसचालक यांनाही श्वसनाचा त्रास सुरु झाला. ते खाजगी टँकरमधुन पाथर्डीला आले. येथे आल्यानंतर त्यांनी डॉ. भगवान दराडे यांना दुरध्वनीवरुन त्रास होत सांगितले. त्यांना तातडीने नगरला पाठविले. तेथे ते कोरोना पाँझिटीव्ह असल्याचे उघड झाले. चेकेवाडी येथे नागरीक भयभीत झाले आहेत.

पाँझिटीव्ह रुग्ण गावात आलेला नसला तरीही कोरोनाची भिती सर्वांच्या चेह-यावर आहे. गाव सील करण्याचे आदेश तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिले आहेत. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाच्या संपर्कात गावातील मुंबई येथे असलेले काही टँकर चालक आले असल्याची माहिती समजली आहे.

ते ग्रामस्थांच्या दूरध्वनीवरुन संपर्कात आहेत. त्यांनाही काळजी वाटते आहे. गावातील लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी आजारी माणसांची माहिती घेणार आहेत.

चेकेवाडी गाव चौदा दिवसासाठी सील करण्यात आले आहे. कोरोना रुग्ण जरी गावाच्या संपर्कात आला नसला तरी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीची उपाययोजना करावीच लागते. नागरीकांनी काळजी घ्यावी.

- नामदेव पाटील, तहसीलदार, पाथर्डी.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT