Vitthalrao Langhe withdraws from elections for Gadakh
Vitthalrao Langhe withdraws from elections for Gadakh 
अहमदनगर

लंघे यांनी माघार घेतली नसती तर मंत्री गडाखांकडे "प्लॅन बी" तयार होता

सुनील गर्जे

नेवासे : आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक तसेच नगर जिल्ह्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत नेवासे तालुक्याच्या सोसायटी मतदार संघातून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचा जिल्हा बँकेत अधिकृत प्रवेश झाल्याचे विश्लेषण राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.

जिल्हा बँकेत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा वेगळाच ठसा असल्याचे वारंवार दिसून आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गडाख कुटुंबातील व्यक्तींनी या बँकेत तालुक्याचे प्रतिनिधीत्व तसेच यशस्वी नेतृत्व केलेले आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व विद्यमान मंत्री शंकरराव गडाख यांनी या बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना बँकेसह शेतकरी हिताचे राज्यपातळीवर दिशादर्शक ठरणारे निर्णय घेतले.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी २००४ मध्ये अंमलात आणलेल्या पुनर्गठन योजनेचा आदर्श राज्यातील इतर सहकारी बँकांसह राष्ट्रीयकृत बँकांनीही राबविला. शासकीय पातळीवरुन या योजनेला विशेष बळ मिळाले.

मंत्री गडाख यांनी महिला बचत गटांना अवघ्या चार टक्के व्याजदराने अर्थसहाय्य करण्याचा घेतलेला निर्णय सामाजिक दृष्ट्या क्रांतीकारक ठरला. शेतकऱ्यांना कमीतकमी व्याजदरात तसेच बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याच्या जिल्हा बँकेच्या बहुतांश धोरणात्मक निर्णयांमागे गडाख कुटुंबच असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

वर्षभरापूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने झालेली राजकीय उलथापालथ पाहता यावेळी तालुक्यात जिल्हा बँकेची निवडणूक रंगतदार होईल असे चित्र उभे केले जात होते.  

निवडणूकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मंत्री गडाख यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या सुविद्य पत्नी रत्नमाला लंघे, नेवासे पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, शिवाजी शिंदे यांनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या गुरुवार या अखेरच्या दिवशी इतर सर्वांनी मागे घेतल्याने मंत्री गडाख यांची या मतदारसंघातून बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.  

ना.गडाख यांची बिनविरोध निवड झाल्याचे वृत्त येताच नेवासे तालुक्यात मोठा जल्लोष करण्यात आला. मंत्री गडाख यांच्या माध्यमातून प्रथमच शिवसेनेचा दमदार प्रवेश जिल्हा बँकेत झाल्याने जिल्हाभरातील शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण आहे.

तर लंघेचें अर्ज ठरले असते बाद!

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी ओबीसी मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी रत्नमाला यांनी सोसायटी व महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गडाख गटाने तांत्रिक बाबींचा आधार घेऊन आक्षेप घेतला असता तर लंघे यांचे अर्ज बाद करणे त्यांना सहज शक्य असल्याचे सहकारातील जाणकारांनी म्हंटले होते. मात्र, मंत्री गडाख यांनी स्वतः किंवा त्यांच्या समर्थकांमार्फत तसे कुठलेही प्रयत्न  केले नाही. अन्यथा लंघेचें उमेदवारी अर्ज बाद झाले असते. माघार घेतली नसती तर प्लॅन बी तयार होता. परंतु ती वेळ आली नाही.
संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT