बाळासाहेब थोरात ई सकाळ
अहिल्यानगर

कोरोनाविरूद्ध फाइटसाठी मंत्री थोरातांची २४ तास वॉर रूम

संगमनेरमध्ये यशोधन कार्यालयात उभारली यंत्रणा

आनंद गायकवाड

संगमनेर ः वाढत्या संसर्गामुळे जिल्हाभरातील कोविड रुग्णांना विविध माहितीसह औषधोपचार मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वॉररुमचे उद्घाटन काल झाले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन या संगमनेरातील मध्यवर्ती संपर्क कार्यालयात साकारलेल्या या वॉररुमचा कोविड बाधीतांसह त्यांच्या नातेवाईकांना फायदा होणार असल्याची माहिती आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली. (War Room was set up by Minister Thorat to fight against Corona)

तांबे म्हणाले, की कोरोना संकटात कॉंग्रेसने सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर प्रभावी काम केले. राज्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मागील व चालू वर्षात कॉंग्रेस पक्ष व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने जनतेला मदत करीत आहेत. स्वतः मंत्री थोरात यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा सातत्याने आढावा घेतला.

जिल्ह्यात रूग्णांसाठी ऑक्‍सिजन व्यवस्था, औषधे व बेडच्या उपलब्धतेसाठी सक्रीय पुढाकार घेतला आहे. या वॉररुममधील मदत केंद्रातून विविध तालुक्‍यातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना साधे, ऑक्‍सीजनयुक्त व व्हेंटिलेटर बेड उपलब्धता, रुग्णवाहिका, प्लाझ्मा व औषधे सुविधांसाठी तत्परतेने मदत केली जाणार आहे.

नगर शहराध्यक्ष किरण काळे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुरेश झावरे उपस्थित होते.(War Room was set up by Minister Thorat to fight against Corona)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT