Rohit pawar E sakal
अहिल्यानगर

शेतमाल साठवणुकीची चिंता मिटली; खर्डा, मिरजगावात गोदामे

आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा

अशोक निंबाळकर

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघात कर्जत तालुक्‍यातील मिरजगाव व जामखेड तालुक्‍यातील खर्डा येथे पाच कोटी 74 लाख रुपये खर्च करून प्रत्येकी 3 हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामांना राज्य वखार महामंडळाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे कर्जत-जामखेड तालुक्‍यांतील शेतकऱ्यांची शेतमाल ठेवण्याच्या चिंता कायमची मिटणार आहे. (Warehousing Corporation approval for godowns at Mirajgaon and Kharda)

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील कर्जत व जामखेड भागात शेतीचे प्रमाण अधिक असले, तरी या दोन्ही तालुक्‍यांमध्ये शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तसेच शासकीय हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर मका, तूर यासह धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यासाठी बाजार समितीच्या गाळ्यांचा आधार घ्यावा लागत असे. त्यामुळे शेतमालाची पूर्णपणे खरेदी करणे शक्‍य होत नव्हते.
शेतमाल ठेवण्यासाठी येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांनी आमदार पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्याची दखल घेत पवार यांनी दोन्ही तालुक्‍यांत गोदामे होण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, मिरजगाव व खर्डा येथे गोदामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतमाल ठेवण्याची चिंता संपली आहे.


अडचण सुटेल
मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.शासकीय हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर अपुऱ्या जागेमुळे पूर्ण क्षमतेने शेतमाल घेता येत नव्हता. त्यावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर मिरजगाव व खर्डा येथे वखार महामंडळाकडून गोदामे उभारणीस मान्यता मिळाली आहे.

आमदार रोहित पवार, कर्जत-जामखेड

(Warehousing Corporation approval for godowns at Mirajgaon and Kharda)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT