Water in 57 villages is polluted 
अहिल्यानगर

 तब्बल 57 गावातील पाणी दुषीत 

सकाळ वृत्तसेवा

नगर : जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील मे महिन्यात पाण्याचे 1536 नमुने तपासण्यात आले. त्यात 57 गावांतील 70 नमुने दूषित आढळून आले आहेत. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात पाणी नमुने दूषित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणी नमुने तपासले जातात. ज्या गावातील पाणी दूषित आढळल्यास त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दर महिन्यात तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे.

मे महिन्यात तपासण्यात आलेल्या 1563 पाणी नमुन्यांपैकी 70 नमुने दूषित आढळले. या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी 4.48 गेली आहे. श्रीगोंद्यात तेरा गावांतील पंधरा पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. त्याखालोखाल पाथर्डी तालुक्‍यातील दहा गावांतील दहा पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. 

जामखेड व पारनेर अहवालात निल 
जामखेड व पारनेर तालुक्‍यात एकही पाण्याचा नमुना दूषित आढळून आलेला नाही. जामखेडमधील 52, तर पारनेरमधील 98 पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. 

तालुकानिहाय तपासलेले नमुने कंसात दूषित नमुने 
नगर ः 108 (एक), अकोले ः 140 (पाच), कर्जत ः 128 (नऊ), कोपरगाव ः 144 (तीन), नेवासे ः 191 (दोन), पाथर्डी ः 138 (दहा), शेवगाव ः 93 (सहा), राहाता ः 61 (दोन), राहुरी ः 118 (दहा), संगमनेर ः 106 (तीन), श्रीगोंदे ः 130 (पंधरा), श्रीरामपूर ः 56 ः (चार).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : शिवेंद्रसिंहराजेंच्या बदनामीकारक पोस्टप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; 'आम्ही सातारकर' संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT