अहिल्यानगर

चाळीस वर्षे वाट पाहिली ः नागापूर, बोल्हेगावला फेज २ चे पाणी

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगरः मी महापौर असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून फेस २ पाणी योजना मंजूर करून आणली. शहरामध्ये विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या तयार केल्या. आता शहराची फेज २ पाणी योजना अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागाची फेज २ पाणी योजना सुरू केली असून यामध्ये आज नागापूर, बोल्हेगाव परिसरातील नागरिकांना फेज २ पाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. चाळीस वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. (Water from Phase Scheme to Bolhegaon, Nagapur)

मुळा धरणा वरून पाणी उपसा करणाऱ्या अमृत पाणी योजनेचे कामही लवकरच मार्गी लागेल. नगर शहराचा पुढील चाळीस वर्षाचा पाणी प्रश्न मिटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागापूर बोल्हेगाव परिसराचा फेज २ पाणी योजनेचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक कुमार वाकळे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक ॲड. राजेश कतोरे, सरपंच दत्ता सप्रे, हनुमान कातोरे, भीमसेन कोलते महाराज आदी उपस्थित होते.

नगरसेवक कुमार वाकळे म्हणाले, नागापूर-बोल्हेगाव परिसराचा पाणीप्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता, हा प्रश्न सुटावा यासाठी महापालिका प्रशासन व आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरवठा केल्या. त्यामुळे आज हा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

कोरोना अजूनही गेलेला नाही. नागरिकांनी स्वत:ची व कुटुंबियांनी काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी जाताना सॅनिटायझर, मास्कचा वापर करावा.

- संग्राम जगताप, आमदार(Water from Phase Scheme to Bolhegaon, Nagapur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

SCROLL FOR NEXT