The water supply to the health center has been cut off for two months 
अहिल्यानगर

दोन महिन्यापासून आरोग्य केंद्राचा पाणीपुरवठा खंडीत

सकाळ वृत्तसेवा

अकोले (अहमदनगर) : लाडगाव येथे दोन महिन्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी पुरवठा खंडीत आहे. देवगाव, पाभूळवंडी, शेणित, आंबेवंगण, मान्हेरे, शेलविरे, डोंगरवाडी, पिंपरकणे, बाभूळवंडी, मदगेवाडी, सुपेवडी, टिटवी, पिंपाळगाव नाकविंदा येथून नागरिक उपचासाठी येत असतात. दवाखान्यात पाणी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. कुटुंब नियोजन, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची कुचंबना होते. यासंदर्भात ग्रामसेवक उघडे यांना वेळोवेळी पत्र देऊन देखील जाणूनबूजुन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. 
प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्‍टर्स, नर्सेस तसेच सेवक वर्ग याठिकाणी राहत असतात. दिवसभरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच वर्दळ असते. याठिकाणी आलेल्या आजारी रुग्णांना स्वच्छगृहात पाणी नसल्यामुळे रुग्णांची धांदल उडते. रुग्ण व त्यांच्या सोबत आलेले नातेवाईक पाणी उपलब्ध नसल्यामुळे त्रस्त होतात. यामुळे डॉक्‍टर व नर्स यांना बोलणे रोजचे खावे लागते आहे. दवाखान्यात आलेल्या व्यक्तीला पाणी सुध्दा पिण्यास मिळणार नाही, अशी परिस्थिती त्याठिकाणी झाली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रोगांचा प्रतिबंध, आरोग्याचा प्रसार आणि आजारांवरचे उपचार करणे हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य कार्य आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्यकरता कार्यक्रम राबविणे, हिवताप, हत्तीरोग, टीबी, कुष्ठरोग, अंधत्व, लैगिंक रोग आणि एड्‌स वगैरे आजारांवर नियंत्रण, गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरवणे. हल्ली भारत सरकारने सर्व बाळंतपणे घरी न होता रुग्णालयात व्हावे, या दृष्टीने प्रयत्न सुरु केलेले आहेत, संततिनियमनाच्या सेवा, शस्त्रक्रिया तसेच सुरक्षित गर्भपात करणे आदी कामे या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत चालविली जात असतांना देखील सरपंच व ग्रामसेवकांनी लक्ष देणे गरजेचे होते. परंतु यावर गांभीर्याने विचार केलेला दिसून येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT