watermelon eating benefits skin diabetics water level in body health  Sakal
अहिल्यानगर

Watermelon Benefits : शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित करणारे कलिंगड; मधुमेहींनाही नाही धोका; चांगल्या त्वचेसाठीही उपयुक्त

प्रत्येक हंगामातील प्रत्येक फळं हे शरीराला पोषक असते. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज अधिक असते. ती गरज कलिंगडाने भरून निघू शकते असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : प्रत्येक हंगामातील प्रत्येक फळं हे शरीराला पोषक असते. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज अधिक असते. ती गरज कलिंगडाने भरून निघू शकते असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

फळांची उपलब्धता, शारीरिक क्षमता आणि वेळ यानुसार फळे ग्रहण करावीत. उन्हाळ्यात चवीला गोड आणि लालभडक गर असलेले कलिंगड सर्वांनाच आकर्षित करते. परंतु बाजारातील रासायनिक फळांपासूनही सावधान राहिले पाहिजे.

फळे खाण्याचे प्रमाण झाले कमी

सध्या शहरातील बाजारपेठांमध्ये कलिंगड विक्री होत आहे. आता रासायनिक प्रक्रियेमुळे बारा महिने फळे उपलब्ध होतात. तरीही त्या-त्या हंगामात मोठ्या प्रमाणात फळे बाजारात येतात. सध्या २० ते ५० रुपयांपर्यंत कलिंगडची विक्री सुरू आहे. लालभडक गर आणि चवीला गोड असलेले कलिंगड उन्हाळ्यात शरीराला उत्तम आहे. परंतु बाजारातील कलिंगड रसायनयुक्त तर नाही ना? ही शंका निर्माण झाल्याने, सर्वसामान्य नागरिकांमध्ये फळे खाण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे.

कलिंगडचे फायदे

  • कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते.

  • नियमित कलिंगड खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच, त्याचा रस अॅनिमियाच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरते.

  • सकाळी, रात्री हे फळ खाणे टाळले पाहिजे. यामुळे पोट बिघडू शकते.

  • कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

  • शरीरात कोणत्याही प्रकारची जळजळ असल्यास कलिंगड त्यापासून आराम देते.

  • कलिंगड अनेक पोषक तत्त्वांनी युक्त फळ आहे. जे कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित करते.

  • मधुमेहचे रुग्ण कलिंगडपासून दूर राहतात, परंतु यामध्ये अमिनो अॅसिड सिटुलीन आणि नायट्रिक ऑक्साइड आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.

  • उन्हाळ्यात उष्णतेमुळे ओठ कोरडे होण्यापासून वाचविते.

उन्हाळ्यात कलिंगड खाणे अतिशय उत्तम आहे. शरीरातील पाणी वाढविते. शेतकरी उत्पादन वाढविण्यासाठी एक ठराविकमात्रापर्यंत रासायनिक खत वापरतो. परंतु कलिंगडमध्ये गोडवा अथवा लालसरपणा आणण्यासाठी काही करीत नाही. मात्र व्यापारीवर्ग कलिंगड टिकविण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया करतात. त्यामुळे ग्राहकापर्यंत जाणारे कलिंगड कसे जाते, हे त्या व्यापाऱ्यावर अवलंबून असते.

- शिवाजी लोखंडे, शेतकरी

सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि उन्हाळ्यात शारीरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे फळ म्हणजे कलिंगड आहे. किमान दोन दिवसाला एक तरी कलिंगड खावे. खास करून महिलांनी फळ खाण्यावर भर द्यावा. अतिस्वस्तात मिळणाऱ्या कलिंगडपासून सावधान राहिले पाहिजे. नीट चौकशी करूनच फळ घ्यावे.

- डॉ. बळी हराळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT