weather update heat wave Temperature at 42 degrees ahmednagar
weather update heat wave Temperature at 42 degrees ahmednagar sakal
अहमदनगर

उष्म्याची लाट निर्मनुष्य वाट; तापमान ४२.७ अंशावर

सकाळ वृत्तसेवा

नगर तालुका : गेल्या तीन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. तापमान ४२.७ अंशावर गेले आहे. रस्त्यांवरील डांबर वितळत असल्याने वाहने चालविणे अवघड होत आहे. उष्णतेमुळे रस्त्यांवर अघोषित संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यामध्ये सध्या उष्णतेची लाट आली आहे. विदर्भासह मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ही लाट आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसण्यास सुरवात होते. सकाळी ११ पासून तापमानात ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचते. त्यामुळे रस्त्यावरील डांबर वितळण्यास सुरवात होते.

अवजड वाहतूक करणारे ट्रक, टॅंकर सारख्या वाहनांची चाके या डांबरात फसली जात आहेत. त्यामुळे अवजड वाहन चालक दुपारी वाहने चालविणे बंद करतात. तीन चाकी आणि दुचाकी वाहने रस्त्यावरील डांबराच्या पंक्‍चर होतात. अशा परिस्थितीत वाहने चालविणे अवघड होत आहे. परिणामी, सर्वच रस्त्यांवर अघोषित संचारबंदीसदृश परिस्थिती निर्माण होत असते. उष्णतेच्या लाटेचा परिणाम प्राणी-पक्ष्यांवरही झाला आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी घनदाट सावलीच्या असणाऱ्या मोठ्या वृक्षांचा आधार घेत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे रस्त्याकडेला असलेल्या शीतपेयांची मागणी वाढली आहे. उसाचा रस, ताक, लस्सी या शीतपेयांसाठी मोठी गर्दी वाढत आहे. सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, व्यापारी संघटनांच्या वतीने जागोजागी पाणपोईची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्णतेचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने आणखी दोन दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  • तहान लागली नाही, तरी पुरेसे पाणी प्यावे.

  • सौम्य रंगाचे, सैल व सुती कपडे वापरावेत.

  • बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बुटांचा वापर करावा.

  • प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

  • उन्हात काम करताना डोक्‍यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा,

  • ओल्या कपड्यांचा डोके, मान, चेहरा यांसाठी वापर करावा.

  • लस्सी, लिंबू-पाणी, ताक यांचा नियमित वापर करावा.

  • उन्हामुळे चक्कर आल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

  • पाळीव जनावरे सावलीत बांधावीत व पुरेसे पाणी पाजावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT