While harvesting sugarcane at Rawatale, the sugarcane system caught fire.jpg 
अहिल्यानगर

ऊस तोडणी सुरु असताना यंत्रालाच लागली आग; 75 लाखांचे नुकसान

सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव तालुक्यातील रावतळे येथे ऊस तोडणी सुरु असताना ऊस तोडणी यंत्रात बिघाड होवून यंत्राला अचानक आग लागली. या अचनाक लागलेल्या आगीत यंत्र जळून खाक झाले. यामुळे यंत्र मालक हनुमंत बाबुराव बारगजे राहणार अकोला (ता. पाथर्डी) यांचे सुमारे ७५ लाखाचे नुकसान झाले.
  
याबाबत समजलेली माहिती अशी की, ऊस तोडणीसाठी कामगार मिळत नसल्यामुळे त्यावर उपाय म्हणून अनेक साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत. तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने शेवगाव तालुक्यासह जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील साखर कारखान्यांनी ऊस तोड मजूर व ऊस तोडणी यंत्राव्दारे ऊसतोड सुरु केली आहे.

रावतळे कुरुडगाव येथे ज्ञानेश्वर गंगाधर भराट यांच्या दोन एकर ऊसाच्या क्षेत्रामध्ये पियुश प्रा.ली. वाळकी (ता. नगर) या साखर कारखान्यासाठी हे ऊस तोडणी यंत्र क्रमांक एम.एच.१६ सी.व्ही ०२२८ हे ऊस तोड करीत होते. सकाळी ९ वाजता १० गुंठे ऊस तोड केल्यानंतर या मशीनमध्ये अचानक आग लागली.

परिसरात पाण्याची कुठलीच सोय नसल्याने या आगीत हे मशीन पूर्ण जळून खाक झाले. मशीनमध्ये आग लागल्यानंतर प्रसंगावधान साधून चालक अंबादास दिलीप वाघमोडे यांनी उडी मारल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र आग विझवताना महेश ज्ञानदेव बारगजे हे जखमी झाले. मशीनला लागलेल्या आगीमुळे ज्ञानेश्वर भराट यांचा ऊसही जळून खाक झाला.

आकोला (ता. पाथर्डी) येथील हनुमंत बाबुराव बारगजे यांनी पाच महिन्यापूर्वीच कर्ज काढून हे मशीन खरेदी केले होते. मशीनमध्ये अचानक आग लागल्याने ते  जळून खाक झाल्याने ७५ लाख रुपयांचे नुकसान होवून आर्थिक फटका बसला आहे. यंत्राला आग लागल्याचे कळताच परिसरातील शेतक-यांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली होती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT