Who is blocking the water of Shrigonda? 
अहिल्यानगर

कुकडीच्या पाण्यात श्रीगोंदेकरांची नाकेबंदी, नेमकी कुणाच्या इशाऱ्यावरुन 

संजय आ. काटे

श्रीगोंदे : कुकडी आवर्तनात श्रीगोंद्यात पाण्याची चोरी होते, असा आरोप झाली नि पाईप काढण्यासाठी यंत्रणा राबली. त्याचवेळी पुणे जिल्ह्यातील पाणी चोरी रोखण्यासाठी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळ्याला पट्टी बांधली. येडगाव धरणातून 1 हजार क्युसेक्सने पाणी सोडले. मात्र आज सायंकाळी चार वाजता श्रीगोंद्याची हद्द सुरु होणाऱ्या 110 व्या किलोमीटरला यातील केवळ 300 क्युसेक्सच पाणी येत अाहे. उरलेले पाणी वरच्या हद्दीतच मुरले जात आहे. 

श्रीगोंद्याच्या हद्दीत चोरी नको असा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना वरच्या भागाची चोरी कशी दिसत नाही असा सवाल उपस्थितीत होत आहे. सगळे त्यांच्याच इशाऱ्यावरुन सुरु तर नाही ना अशी शंका घेतली जात आहे. 6 जूनला कुकडीचे आवर्तन सुरु झाले. त्यापुर्वी उपोषणे आणि नंतर कालव्यातील आंदोलने झाली. श्रीगोंद्याच्या वाट्याला पाच दिवस आणि 410 दशलक्षघनफूट पाणी आल्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील इतिवृत्तात नमुद आहे. त्यात असेही आदेश आहेत की श्रीगोंद्याच्या हद्दीतील 110 व्या किलोमीटरला 950 क्युसेक्स तर कर्जतची हद्द सुरु होणाऱ्या 165 व्या किलोमीटरला 650 क्युसेक्स पाणी देण्याचे बंधन आहे.

कालवा सुटून तीन दिवस झाले अाहेत. श्रीगोंद्याच्या हद्दीच्या सुरुवातीला आज दुपारी चार वाजता केवळ 300 क्युसेक्सच पाणी येत होते. किलोमीटर 30 ते 55 या दरम्यान पाण्याची मोठी चोरी सुरु आहे. याचा अर्थ वरच्या भागात बिनधास्त पाण्याचा वापर सुरु होता. श्रीगोंद्यातील पाणी चोरीला आरोप करुन पाईप काढायला सांगणाऱ्या पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांना ही चोरी कशी दिसत नाही. या सगळ्या प्रक्रियेत श्रीगोंद्याची चोरी बंद केल्याचा देखावा करुन खालच्या भागाला पूर्ण क्षमतेने पाणी दिले जाणार अाहे. श्रीगोंद्यावर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे. 

आमदारांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ? 
आमदार बबनराव पाचपुते व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या उपोषणात अधिकाऱ्यांनी कर्जत हद्दीत 650 क्युसेक्स पाणी देवून उरलेले पाणी श्रीगोंद्यातील वितरीकांना सुरु करु असे सांगितले होते. आता कर्जतच्या हद्दीत तेवढे पाणी देताना उरलेले पाणी श्रीगोंद्याच्या हद्दीतील तलावात सोडून अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळावा. श्रीगोंद्याच्या वरच्या भागात चोरी चालते मग नियमात दिलेला शब्द अधिकाऱ्यांनी खरा करुन दाखविला तर येथील तलावात पाणी पोचेल अन्यथा अडचणीचे दिसत आहे. 

आज सकाळी 11 व पुढे दुपारी 4 वाजता असे होते पाण्याचे मार्गक्रमण...(सगळे आकडे क्युसेक्समध्ये) 
येडगाव धरण- 1000 - 1000 
30 व्या किलोमीटरला- 910 - 900 
55 व्या किलोमीटरला- 550 -500
78 व्या किलोमीटर- 410- 400
श्रीगोंदेहद्द- 110 व्या किलोमीटर- 267 व 300 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT