उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात
उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात Sakal
अहमदनगर

Shirdi Lok Sabha Constituency : उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात

​शांताराम काळे

अकोले : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आता उमेदवारी कोणाला, याची चर्चा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक, तर आहेतच. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, महायुतीचा उमेदवार कोण व वंचितची भूमिका काय, हे अजूनही स्पष्ट नसल्याने सर्वच पक्षांत गोंधळ दिसत आहे.

खासदार सदाशिव लोखंडे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेस पक्षाच्या उत्कर्षा रूपवते, राजेंद्र वाघमारे, जनहित लोकशाही पक्षाचे अशोक अल्हाट, नचिकेत खरात, भाजपचे नितीन उदमले आदी या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, आजी-माजी खासदारांची मदार अकोले तालुक्यावर आहे.

२००८ साली शिर्डी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला, तो अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्या वर्षी शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे व रिपाइंचे (आठवले गट) रामदास आठवले यांच्यात लढत होऊन वाकचौरे विजयी झाले.

त्यानंतर काही कारणास्तव वाकचौरे यांनी खासदारकीची पहिली टर्म संपल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेकडून बबनराव घोलप यांचे नाव निवडणुकीसाठी आघाडीवर असताना त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाही आणि ऐनवेळी भाजपमधून कर्जत-जामखेडचे आमदार असलेले सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करत अवघ्या १७ दिवसांत खासदार होण्याचा विक्रम आपल्या नावी केला.

स्व. प्रेमानंद रूपवते यांना शिवसेनेने तिकीट देऊ केले. मात्र, त्यांनी काँग्रेस सोडली नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा पुन्हा शिवसेनेकडून खासदार झाले. आता माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड हे भाजपमध्ये असून,

आमदार डॉ. किरण लहामटे, सीताराम गायकर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असल्याने युतीचे पारडे जड आहे. मात्र, तालुक्यात आजी-माजी आमदारांनी केलेली विकासकामे, तर खासदार लोखंडे यांनी केलेल्या विकासकामांचा प्रभाव मतदारांना किती भावतो, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

अकोले तालुक्यातील जलजीवनच्या कामाबाबत असणारी नाराजी व ऐन उन्हाळ्यात निवडणूक असल्याने नाराजीचे चटके सत्ताधारी खासदार यांना बसण्याची चर्चा आहे.

तर लोखंडेंचे गणित बिघडणार

भाऊसाहेब वाकचौरे यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे. शिवसेना, शरदचंद्र पवार गट, माकप, वंचित आघाडी, काँग्रेसची एकजूट झाली, तर लोखंडे यांचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT