Why Mahavikas Aghadi government is asking the Center for help
Why Mahavikas Aghadi government is asking the Center for help 
अहमदनगर

मदत मागता, महाविकास आघाडी केंद्राला विचारून केली का काय? विखेंचा सवाल

सतीश वैजापूरकर

शिर्डी: केंद्राकडे मदतीसाठी अपेक्षा करता, महाविकास आघाडीची स्‍थापना केंद्राला विचारुन केली का? असा संतप्‍त सवाल भाजपाचे जेष्‍ठ नेते आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला.  

पंचनाम्‍याचा फार्स करुन नुसती आश्‍वासन देण्‍यापेक्षा कृती करा आणि राज्‍यातील शेतक-यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत देण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.  

राहाता पंचायत समिती आणि जनसेवा फौंडेशनच्‍या वतीने अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित केलेल्‍या कार्यक्रमानंतर आ.विखे पाटील यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. शेतक-यांच्‍या मदतीबाबत महाविकास आघाडी सरकारचे मंत्री बांधावर गेले असले तरी, सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडुन दिले  असल्‍याचा आरोप आ.विखे पाटील यांनी केला.

सत्‍तेसाठी सर्व तत्‍व आणि विचार सोडुन एकत्र आलात, राज्‍यात महाविकास आघाडी केंद्राला विचारुन स्‍थापन केली का? तुमच्‍यात धमक असेल तर, एक पाऊल पुढे टाका आणि शेतक-यांना हेक्‍टरी 50 हजार रुपयांची मदत मिळायला हवी अशी मागणी करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, राज्‍यावर अतिवृष्‍टीचे संकट आले तेव्‍हा मा.पंतप्रधानांनी मुख्‍यमंत्र्यांना फोन करुन सहकार्याबाबत आश्‍वासित केले. पण राज्‍य सरकार म्‍हणून तुम्‍ही तुमची जबाबदारी निभावणार आहात की नाही?

अधिकच्‍या मदतीसाठी सर्वपक्ष मिळून आपण केंद्राकडे जावु असे सुचित केले. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री मात्र आपला नाकर्तेपणा झाकत असल्‍याची टिका त्‍यांनी केली.

राज्‍यात दूध उत्‍पादक शेतक-यांनाही महाविकास आघाडी सरकार दिलासा देवू शकलेले नाही. मंत्र्यांचेच दूधसंघ आहेत. सरकारच्‍या अनुदानाचा या मंत्र्यानी दूध उत्‍पादक शेतक-यांना किती लाभ दिला असा सवाल उपस्थिती करुन  या अनुदानाचे ऑडीट करण्‍याची मागणी करुन आ.विखे पाटील यांनी सांगितले की, सरकारच्‍या हलगर्जीपणामुळेच राज्‍यात शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍यांची संख्‍या वाढत आहे.  

कोरोना संकटाच्‍या काळातही या सरकारने शेतक-यांना कोणतीही मदत केली नाही. कवडीमोल भावाने शेतक-यांना आपला उत्‍पादीत माल विकावा लागला. सरकारमध्‍ये फक्‍त घोषणा होतात आणि खोटी आश्‍वासन दिली जातात.

आजही बांधावर गेलेल्‍या मंत्र्यांबाबत आमचा आक्षेप नाही, आम्‍हाला यात राजकारण करायचे नाही. शेतक-यांना मदत मात्र तातडीने मिळाली पाहीजे यासाठी विरोधी पक्ष म्‍हणून आम्ही आमची भूमिका बजावणार असल्‍याचे त्‍यांनी ठामपणे सांगितले.
संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भूषण पाटील यांना काँग्रेसकडून देण्यात आला AB फॉर्म

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश म्हस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Viral Video: पत्नी जावायाच्या प्रेमात पडल्याचे कळताच पतीने लावून दिले लग्न, टाळ्यांच्या कडकडाटात गावानेही केले स्वागत

Mazi Tuzi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ'चा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला; मालिकेत करण्यात आले 'हे' बदल

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT