The wife killed with the help of her boyfriend 
अहिल्यानगर

उपचारादरम्यान रूग्णाचा मृत्यू, अकरा महिन्यांनी आलेल्या रिपोर्टने गावकऱ्यांसह पोलिसही चक्रावले

नीलेश दिवटे

कर्जत : तालुक्यातील एका व्यक्तीस त्याच्या पत्नीने उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याची सेवाही करीत होती. काही दिवसांनी त्याचे निधन झाले. परंतु अकरा महिन्यांनी समोर आला तो प्रकार धक्कादायक होता.

या बाबत वृत्त ः असे की,  मिरजगाव पोलीस दुरक्षेत्र हद्दीतील तिखी येथील  प्रमोद कोरडे (रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याचा नगर विळद घाट येथील विखे हॉस्पिटल येथे औषधोपचार घेत असताना अकरा महिन्यांपूर्वी (२ मार्च २०२०) मृत्यू झाला होता.

सदर तपासात मयताची पत्नीने  सुरुवातीस पोलिसांना माझ्या पतीचा मृत्यू हा आजारपणाने तसेच दारूचे नशेत अती मद्यप्राशनाने कोमात गेल्याने झाल्याचे सांगितले. या मृत्यूबाबत तिची तक्रार नसल्याचे सांगितले होते. त्या मुळे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृतदेहास बाहेरून दिसणाऱ्या जखमा नव्हत्या. मात्र, संबंधित विवाहित महिलेचे वर्तन संशयास्पद वाटल्याने तसेच पोलिसांनी ती राहत असलेल्या परिसरात गोपनीय माहिती घेतली. तिच्या पतीचा आजारपणाने मृत्यू झाला की घातपाताने या बाबत संशय बळावला होता.

रिपोर्ट तपासले

पोलिसांनी सखोल तपास करून अधिक माहिती मिळवली. पुराव्यासाठी मयताचे वैद्यकीय अहवाल नाशिक आणि पुणे येथून प्राप्त केले. या बाबत तेथील उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी पत्रव्यवहार केला. त्या मिळालेल्या माहितीवरून पोलिसांना मयताचे मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने सखोल तपास केला. त्यावेळी वेगळीच भानगड त्यांच्या निदर्शनास आली.

पोलिसी खाक्या दाखवताच

सुरूवातीला पोलिसांनी मयताची पत्नी अनिता प्रमोद कोरडे (वय ३० ) आणि योगेश बाळासाहेब  बावडकर (वय ३५) (दोन्ही रा. मिरजगाव ता. कर्जत) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. सुरुवातीपासून पोलिसांना गोल गोल उत्तरे देत पतीचा मृत्यू व्यसनामुळे झाल्याचे सांगणाऱ्या पत्नीला व योगेशला पोलिसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्यांनी आपले अनैतिक संबंध असल्याची कबुली दिली. पती अडसर ठरत असल्याने दोघांनी संगनमताने प्रमोद बाळासाहेब कोरडे (वय ३५) याच्या डोक्यात फुंकारीने प्रहार आणि  मारहाण करून खून केल्याचे कबूल केले.

खुनाची दिली कबुली

घटनेनंतर दोन्ही आरोपीनीच मयतास दवाखान्यातसुद्धा दाखल केले. सदर सर्व प्रकाराबाबत दोघा आरोपींनी पोलिसांना माहिती दिली. आरोपींचे विरूद्ध मयताचा भाऊ श्रीकांत कोरडे याच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने माहिती लपवून ठेवली असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी मयताची पत्नी अनिता कोरडे  व तिचा प्रियकर योगेश बाळासाहेब बावडकर यांना अटक केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाययक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस सब इन्स्पेक्टर अमरजित मोरे व भगवान शिरसाठ , 
महिला पोलिस हवालदार शबनम शेख, पोलीस भाऊसाहेब यमगर, पोलिस महादेव कोहक,गोवर्धन कदम, श्याम जाधव, अमित  बरडे यांनी केली असून गुन्ह्याचा  पुढील तपास आमरजीत मोरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT