अहिल्यानगर

अकोले पंचायत समितीत महाविकास आघाडीचा सभापती होणार का?

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : तीन महिन्यांपूर्वी पंचयतसमितीचे सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने पंचायत समितीच्या सभापतीपदाची जागा रिक्त होती. मात्र या पदासाठी गुरुवारी (ता. २३) सकाळी ११वाजता निडणूक होत आहे. या निवडणुकीत १२ पैकी ११ सदस्य मतदानाचा हक्क बजवणार आहेत. 

सभापतीपदासाठी भाजपतर्फे उर्मिला राऊत व अलका अवसरकर या ओबीसी महिलांचे नाव चर्चेत आहे. पक्ष श्रेष्टींनी दोन्ही महिलांचे कागदपत्र स्वीकारले असून उद्या सकाळी निवडणुकीपूर्वी नाव निश्चित होणार आहे. या निवडणुकीत ८ व ३ अशी संख्या समोर आल्याने या निवडणुकीत भाजपचे पारडे जड असून उमेदवारीबाबत माजी मंत्री मधुकर पिचड हेच अंतिम निर्णय घेणार आहेत.

भाजप समोर आमदार डॉ. किरण लहामटे यांची महाअघाडी काय भूमिका घेते हे समजेल मात्र या आघाडीत शांतता असून आघाडीतील ४ पैकी १ उमेदवाराने भाजपच्या नेत्याशी संपर्क साधून आपणाला संधी द्यावी, अशी मागणी केली. ही निवडणूक प्रतिष्टेची असून ११ पैकी सहा सदस्य ज्यांच्याकडे असेल त्यांचा सभापती निश्चित मानला जातो. मात्र हा आकडा उद्या सकाळी पाहायला मिळेल.

अकोले तालुका सभापती म्हणजे मिनी आमदार असून सभापतिपदी महिला ओबीसी विराजमान होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने ऐनवेळी ते निवडणुकीतून माघार किंवा तटस्थ राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र उर्मिला राऊत की अलका अवसरकर याबाबत तालुक्याचे पक्ष श्रेष्टी सकाळी निर्णय घेऊन निवडणुकीचा फॉर्म भरला जाईल.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT