Will rehabilitate those who have withdrawn from Gram Panchayat - Lanka 
अहिल्यानगर

ग्रामपंचायतीत माघार घेणाऱ्यांचे राजकीय पुनर्वसन करणार - लंके

मार्तंड बुचुडे

पारनेर ः गेल्या अनेक वर्षांचा राजकीय विरोध झुगारून मनाचा मोठेपणा दाखवित विरोधकांनी माझ्यावर विश्वास टाकत हंगे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. यापुढे हंगे एक परिवार असेल. माघार घेणाऱ्या विरोधकांचे राजकीय पुनर्वसन करण्याची जबाबदारी माझी आहे. मी दिलेला शब्द पाळणारा माणूस असल्याने आज आमदार आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. 

हंगे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर गावात विजयी सभा झाली. त्यावेळी लंके बोलत होते. ते म्हणाले, ""ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे श्रेय सर्व ग्रामस्थांचे आहे, माझे नाही. सर्वांनी राग-लोभ विसरून एकत्र येत मतभेदांना तिलांजली दिल्याने आता हंगे एक परिवार म्हणून ओळखले जाईल.'' 

बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीला विकासासाठी 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा लंके यांनी केली होती. काही गावांतून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, लंके यांचे स्वत:च्याच हंगे येथे काही पारंपरिक विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने गावची निवडणूक बिनविरोध होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, शेवटी विरोधकांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. त्याबद्दल लंके यांनी ग्रामस्थांसह विरोधकांचे विशेष आभार मानले.

ग्रामपंचायत निवडणुकीत संघर्ष व्हायचा. अटीतटीच्या लढती होत. मात्र, सुमारे 15 वर्षांच्या संघर्षानंतर आज आपण एका व्यासपीठावर आलो. हंगे गावच्या इतिहासात हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा प्रसंग असल्याचे लंके म्हणाले.

गावातील भांडण आता पोलिसांत जाणार नाही. गावातील वाद गावातच मिटवू. आपण राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेलो नाही. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णयही राजकीय कारणांसाठी घेतलेला नाही. त्यातून कटूता दूर करण्याचे मोठे काम झाले, असे लंके म्हणाले. 

बिनविरोध उमेदवार 
राजेंद्र दळवी, वनीता शिंदे, नीता रासकर, जगदीप साठे, सविता नगरे, रुपाली दळवी, सुलोचना लोंढे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब दळवी, मेघा नगरे व माया साळवे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांना मोठा दिलासा, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

बाबर आझमवर आली ७ वर्षांनंतर डोमेस्टिक क्रिकेट खेळण्याची वेळ; खराब फॉर्म अन् पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर PCBचा मोठा निर्णय

IPS भानु प्रताप कोण? UPSCच्या तयारीवेळी प्रेमविवाह, आता पत्नीने केले गंभीर आरोप; लेकीची बॅग घेऊन घरासमोर बसली

Latest Marathi News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

SCROLL FOR NEXT