A woman farmer has died after getting stuck in a threshing machine at Kolhewadi : 
अहिल्यानगर

शेतकरी महिलेची मळणी यंत्रात अडकून मृत्यू; कोल्हेवाडी येथील घटना

वसंत सानप

जामखेड (अहमदनगर) : कोल्हेवाडी (ता.जामखेड) येथे मळणी यंत्राखाली पडलेले भुस्कट काढण्यासाठी खाली वाकलेल्या सिंधुबाई बजरंग कोल्हे          ( वय -४२) या शेतकरी महिलेचे मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २६) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. त्यामुळे सर्वत्र सुगीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून साकत परिसरातही मोठय़ा प्रमाणावर सुगीचे काम सुरू आहे. मजुर मिळत नाहीत. त्यामुळे घरातील लोक सुगीच्या कामासाठी झटत आसतात.

कोल्हेवाडी येथे बजरंग कोल्हे यांच्या शेतात ज्वारीचे खळे सुरू होते. कुटुंबातील लोक मळण यंत्रावर काम करत होते. खळे संपत आले असताना मळण यंत्राखाली पडलेले भुसकट काढण्यासाठी सिंधुबाई कोल्हे या वाकून भुसकट काढत होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर व मळण यंत्र ज्या ठिकाणी जोडले जाते त्या शाप्टमध्ये सिंधुबाई यांच्या साडीचा पदर अडकला व शाप्टसोबत त्यांच्या शरीराचा भागही गुंतला. डोके ही मळणी यंत्रात अडकले काही समजण्याच्या आत ही दुर्घटना घडली. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सिंधुबाई कोल्हे यांच्या मागे पती, दोन मुले, सुन व नातवंडे असा परिवार आहे. ही घटना समजताच साकत व कोल्हेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या सुगीची धामधूम सुरू आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, गडबडीत वाईट घटना घडतात. तेव्हा मळण यंत्र हाताळताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT