Money fraud esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : क्रेडिट कार्डच्या नावाने महिलेने घातला लाखाचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : क्रेडिट कार्डचे (Credit card) लिमिट वाढविण्यासाठी आलेल्या मोबाईल कॉलवर ओटीपीची (OTP) माहिती सांगितल्याने खात्यातून 99 हजार 274 रूपये गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी येथील सायबर पोलिस ठाण्यात औदुंबर सुभाष राऊत (रा. बेलापूर ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आराध्या शर्मा नावाच्या महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ता. 27 डिसेंबर 2021 रोजी औदुंबर राऊत यांना त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून आराध्या शर्मा बोलत आहे, तुमच्या क्रेडिट कार्डचे लिमिट वाढले असून व्हेरिफिकेशनसाठी कॉल ( verification call) केला असल्याचे राऊत यांना सांगितले. क्रेडिट कार्डचे लिमिट वाढणार असल्याने राऊत यांनी त्या कॉलला प्रतिसाद दिला. मोबाईलवर आलेल्या दोन ओटीपीची माहिती त्यांनी समोरून बोलणाऱ्या शर्मा नावाच्या महिलेला दिली. यानंतर काही वेळातच राऊत यांच्या खात्यातून 99 हजार 274 रूपये कट झाल्याचे त्यांना कळले. याप्रकरणी राऊत यांनी गुरूवार (ता. 13 ) सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राऊत यांना आलेल्या मोबाईल कॉलवरून बोलणाऱ्या आराध्य शर्मा नावाच्या महिलेविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT