World Vision Day jalindar borude 
अहिल्यानगर

प्रत्येकाला सृष्टी दिसावी यासाठी... तिमिरातून तेजाकडे नेणारा अवलिया!

सूर्यकांत वरकड

नगर ः अंधांना दृष्टी देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना झटत आहेत. त्यातही ग्रामीण भागातील नागरदेवळे (ता. नगर) येथील जालिंदर बोरुडे या अवलियाने हे काम 27 वर्षे अविरत सुरू ठेवले आहे. आतापर्यंत 810 जणांना दृष्टी देण्यासह सुमारे दोन लाख व्यक्तींवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या अजोड कामगिरीचे आज सर्वच स्तरांतून कौतुक होते. 

नागरदेवळे येथील जालिंदर बोरुडे हे जलसंपदा विभागात टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. समाजसेवेची आवड असल्याने व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापासून प्रेरणा घेत, सामाजिक बांधिलकीतून 1991मध्ये बोरुडे यांनी फिनिक्‍स फाउंडेशनची स्थापना केली. त्याद्वारे बोरुडे यांनी काही व्यक्तींच्या मदतीने समाजसेवेचा श्रीगणेशा केला. सुरवातीला फिनिक्‍स फाउंडेशनने नागरदेवळे परिसरातील नागरिकांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांवर भर दिला. हे सर्व काम त्यांनी स्व-खर्चातून सुरू केले. ते आजही सुरू आहे. अर्थात, कोणतेही सामाजिक काम म्हटले, की अडथळे येणारच.! 

"घरचं खाऊन कशाला लष्कराच्या भाकरी भाजता...?' असे हिणवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या कार्यात खोडा घालण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता कार्य सुरूच ठेवले. फिनिक्‍स फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात कार्याचा विस्तार केला. 27 वर्षांत त्यांनी एक लाख 84 हजार नेत्ररुग्णांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया केल्या. त्यांत सर्वसामान्य कुटुंबीयांसह निराधारांचाही समावेश आहे. त्यांच्या प्रयत्नातून अनेकांना नवी दृष्टी मिळाली. 

मरणोत्तर नेत्रदान चळवळ सुरू केली. आतापर्यंत 72 हजार जणांनी मरणोत्तर नेत्रदानासाठी अर्ज भरून दिले आहेत. त्यांतील 810 जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यामुळे 810 लोकांना नवी दृष्टी मिळाली. त्यांच्या जीवनातील अंधकार कायमचा दूर झाला. प्रकाशमय जीवन आज ते जगत आहेत. नगरसह सोलापूर, नंदुरबार, धुळे, वैजापूर येथील गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. नेत्रदान चळवळीसह आता त्यांनी रक्तदान चळवळ हाती घेतली आहे. ठिकठिकाणी शिबिरे घेऊन ते रक्तसंकलन करीत आहेत. 

नेत्रदान चळवळच हाती घ्यायची, असे काही ठरविले नव्हते. नोकरी करताना ग्रामीण भागासह शहरातील विडी कामगार, बांधकाम कामगार, हमाल, कष्टकरी, शेतकरी, मजूर, महिला, गरीब, वंचित घटकांसाठी काही तरी केले पाहिजे, असे नेहमी मनात येत असे. हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर हजारे यांच्या कार्याने प्रेरित होऊन नेत्रदान चळवळ हाती घेतली. 
- जालिंदर बोरुडे, सामाजिक कार्यकर्ते, नागरदेवळे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT