The youth of Shrigonda filled the animal market online 
अहिल्यानगर

श्रीगोंद्याच्या तरूणांची आयडियाची कल्पना ः जनावरांचा बाजार भरवला अॉनलाईन

संजय आ. काटे


श्रीगोंदे : कोरोना संकटात आठवडे व जनावरांचा बाजार बंद राहिला. त्यामुळे पशुधनाची खरेदी-विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. मात्र, त्यावर तालुक्‍यातील काही तरुणांनी तोडगा काढला. चक्क सोशल मीडियातून त्यांनी पशुधन व शेतीविषयक पिकांची खरेदी-विक्री करण्यासाठी ग्रुप बनविले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. 

कोरोना महामारीने सगळ्यांचेच मोठे नुकसान झाले. बाहेर पडणेही मुश्‍कील असल्याने, अनेकांचे खाण्याचेही वांधे झाले होते. त्यातच शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. शेतातील पिके जागीच राहिली, तर विक्रीसाठी आलेले पशुधन घराच्या दावणीला बांधण्याची वेळ आली. 

काही दिवसांपूर्वी तालुक्‍यातील काही तरुणांनी या समस्येवर काहीअंशी तोडगा काढण्यासाठी सोशल मीडियात काही ग्रुप बनविले. त्यात बहुतेक शेतकऱ्यांचीच मुले होती. "कृषी संशोधन बाजार' अशी नावे ग्रुपला देण्यात आली. त्यावरून कोणाच्या घरी गाय, बैल, म्हैस विक्रीसाठी असल्यास तो शेतकरी ग्रुपवर छायाचित्र व त्याबाबतची सविस्तर माहिती टाकतो. त्यानुसार किमतीबाबत व्यक्तिगत चर्चा होऊन पुढील व्यवहार ठरतो. 

अशाच ग्रुपवरून कोणाला कोणते जनावर हवे, याबाबतही विचारणा होते. याच ग्रुपवर जनावरांच्या व्यवहारांसह शेतातील पिकांची विक्री व खरेदी, बाजारभाव यांचीही चर्चा होत असते. त्यामुळे शेतीमाल व जनावरांच्या सद्यःस्थितीची अद्ययावत माहिती तरुणांसह ग्रुपवरील इतरांना मिळत असल्याने, यातून अनेकांच्या समस्या सुटण्यास मदत झाली आहे. 


शेतकऱ्यांना कोरोना महामारीच्या संकटात मदत व्हावी, या भावनेतून सोशल मीडियात वीसपेक्षा जास्त ग्रुप करण्यात आले. त्यावर शेळीपासून बैलांपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात आले. यात तरुणांनी दाखविलेला व्यावहारिकपणा महत्त्वाचा ठरला. 
- आकाश रासकर, बेलवंडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT