ZP school in Ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar ZP School: पटसंख्या तर वाढली पण शाळेची दुरावस्था मात्र कायम; 704 वर्गखोल्यांची कमतरता

Every year, English medium students are turning to Marathi: एकीकडे पटसंख्या वाढत असताना विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी वर्ग खोल्या अपुऱ्या पडत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही दूरवस्था आहे.

सकाळ वृत्तसेवा

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांनी अनेक क्षेत्रांत डंका वाजला आहे. नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, तसेच नासासारखे उपक्रमांनी महाराष्ट्र गाजवला आहे. एकीकडे ही स्थिती असताना शाळांतील वर्गखोल्यांना अवकळा आलीय. परिणामी त्या निर्लेखित केल्याने विद्यार्थ्यांची अडचण होते आहे. तब्बल 704 वर्गखोल्यांची कमतरता आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्ता राखली आहे. त्यामुळे दरवर्षी इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी मराठीकडे वळत आहेत. परिणामी जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या वाढत आहे. एकीकडे पटसंख्या वाढत असताना विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी वर्ग खोल्या अपुऱ्या पडत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही दूरवस्था आहे. मध्यंतरी शिर्डी येथील साईबाबा संस्थानने जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी निधी दिला होता. परंतु त्याचा अद्यपि, उपयोग झालेला नाही.

त्यातील केवळ दहा कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. त्यातून 83 वर्गखोल्या या वर्षी बांधून झाल्या आहेत. उर्वरित 10 कोटी रुपये पडून आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. तो निधी तोकडा असल्याने वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण होत नाही. निधी आणि वर्गखोल्यांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. त्यातून दरवर्षी वर्गखोल्यांची संख्या वाढत गेली आहे.

त्यातच दरवर्षी धोकादायक झालेल्या वर्गखोल्या पाडाव्या लागतात. तोही आकडा वाढतो आहे. निंबोडीच्या शाळेतील खोल्या पडल्याने विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून धोकादायक बनलेल्या शाळांबाबत अहवाल मागविला जातो. आज बांधलेली वर्गखोली लगेच मोडकळीस येते, ही वस्तुस्थिती आहे.

वस्तुस्थिती

एकूण शाळा - 3545

विद्यार्थी - 209476

वर्गखोल्या - 12166

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून यंदा 50 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून सुमारे साडेतीनशे वर्गखोल्या बांधून होतील. साई संस्थानचा 10 कोटी रुपयांचा निधी आहे. त्यातूनही वर्गखोल्यांचे बांधकाम होईल.

- भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT