Corona Vaccination sakal
अकोला

अकोला : लसीकरणाची गती वाढणार कोव्हॅक्सीनचे १६ हजार ९६० डोस

१५ ते १७ वर्षावरील मुलांना ४५६ डोस

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करता यावे यासाठी कोव्हॅक्सीन लसीचे १६ हजार ९६० डोस २० जानेवारी रोजी सायंकाळी मिळाले. त्यामुळे १५ ते १८ वर्ष वयोगटातील नागरिकांसह दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांस लस उपलब्ध होईल आणि लसीकरणाची गती वाढण्यास मदतही होईल.

देशभरात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्यात आले. १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली.

या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर पोहचले. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी कोरोनाची लस न घेतल्याने आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक गतीने करण्याचे अभियान हाती घेतले. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कवच कुंडल अभियान राबवण्यात आले. त्यानंतर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढली. दरम्यान आता लसीकरणाची मोहीम १५ वर्षावरील लहान मुलांसाठी सुद्धा खुली करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील युवक मोठ्या प्रमाणात लस घेत आहेत.

लसीकरणाची व्याप्ती वाढल्याने जिल्ह्यात लसीचा काही प्रमाणात तुटवडा सुद्धा निर्माण झाला होता, परंतु आता लसी उपलब्ध झाल्याने लसीकरणाची गती वाढेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

१५ ते १७ वर्षावरील मुलांना ४५६ डोस

आता लसीकरणाची मोहीम १५ वर्षावरील लहान मुलांसाठी सुद्धा खुली करण्यात आली असून, पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकूण ४५६ मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

  • एकूण लसीकरण - १८ लाख २८ हजार १०८

  • पहिला डोस - ११ लाख ६९ हजार ११०

  • दुसरा डोस - ६ लाख ५३ हजार ८०७

  • बुस्टर डोस - ५ हजार १९१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

पगारवाढीसाठी हजारो कर्मचारी आक्रमक, रस्त्यावर उतरून आंदोलन; गाड्या पेटवल्या, पोलिसांवर दगडफेक

Malvan Ice Mystery : कोकणात निसर्गाचा अजब चमत्कार! निळ्याशार आकाशातून थेट घरावर पडला 5 किलोचा बर्फाचा गोळा; मान्सून लांबणीवर पडण्याचे संकेत?

Gold Rate Today: युद्धाच्या भीतीने सोनं स्वस्त! आजचा भाव किती? सोन्यात आणखी घसरण होणार?

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1,500 अंकांनी खाली; कारण काय? कोणत्या शेअर्सला फटका?

SCROLL FOR NEXT