imprisonment  sakal media
अकोला

Akola : मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना २० वर्षांची शिक्षा

खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ता.२ जानेवारी २०१६ रोजी एका मनोरुग्ण महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला होता

सकाळ वृत्तसेवा

अकोला : खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत जानेवारी २०१६ मध्ये एका मनोरुग्ण महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना प्रथम श्रेणी जिल्हा व सत्र न्यायाधीश शयना पाटील यांनी बुधवारी (ता. १३) २० वर्षांची शिक्षा सुनावली. अनुप उर्फ गुड्डू गणेश परिहार (२५) व चंद्रकांत किशोर निलाखे (३५) असे नराधमांची नावे आहेत.

खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ता.२ जानेवारी २०१६ रोजी एका मनोरुग्ण महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला होता. या प्रकरणाची तक्रार पीडितेच्या भावाने खदान पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. अनुप उर्फ गुड्डू गणेश परिहार (२५) व चंद्रकांत किशोर निलाखे (३५) यांनी हा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमुद होते. त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मालती कायटे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.

या प्रकरणात न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदाराच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. न्यायालयाने दोन्ही नराधमांना दोषी ठरवून मनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी भादंवि कलम ३७६ (डी) नुसार २० वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दांड व दंड न भरल्यास ३० दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

सोबतच कलम ३७६ (दोन) नुसार दोषी ठरवून १० वर्खे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३० दिवस साधी कैद, कलम ३६३ नुसा सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. वरील सर्व दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने केला आहे.

पीडितेस फौ.प्र.सं. कलम ३५७ -ए नुसार नुकसान भरापाई अंतर्गत पीडिसेस पुरेसे नुकसान भरपाई देण्याचा आदेश वि. न्यायालयाने पारीत केला आहे. सहाय्यक सरकारी वकील आनंद गोदे यांनी प्रभावीपणे सरकार पक्षाची बाजू वि. न्यायालयात मांडली. पैरवी अधिकारी श्री कान्हेरकर यांनी सहकार्य केले.सोबतच कलम ३७६ (दोन) नुसार दोषी ठरवून १० वर्खे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३० दिवस साधी कैद, कलम ३६३ नुसा सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. वरील सर्व दंडाची रक्कम पीडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने केला आहे.

पीडितेस फौ.प्र.सं. कलम ३५७ -ए नुसार नुकसान भरापाई अंतर्गत पीडिसेस पुरेसे नुकसान भरपाई देण्याचा आदेश वि. न्यायालयाने पारीत केला आहे. सहाय्यक सरकारी वकील आनंद गोदे यांनी प्रभावीपणे सरकार पक्षाची बाजू वि. न्यायालयात मांडली. पैरवी अधिकारी श्री कान्हेरकर यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT