21 lakh people get corona vaccine in Akola district 
अकोला

लसीकरणाने ओलांडला २१ लाखांचा टप्पा!

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा नवा विक्रम

सकाळ वृत्तसेवा

अकोला - कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी चौथ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला आरोग्य विभाग प्राथमिकता देत आहे. परंतु नागरिक मात्र लसीकरणाकडे काणाडोळा करत आहेत. असे असले तरी लसीकरणाने २१ लाखांचा टप्पा ओलांडला असून लसीकरणाने आणखी एक विक्रम केला आहे. त्यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १२ लाख २३ हजार ५०६, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ५१ हजार ९७१ तर प्रिकॉशन डोस घेणाऱ्यांची संख्या २५ हजार २७८ आहे.

देशभरात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्यात आले. १ एप्रिल २०२१ पासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली. त्यामुळे या वयोगटासाठी मोहीम सुरू झाल्यानंतर अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर पोहचले.

परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी कोरोनाची लस न घेतल्याने आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक गतीने करण्याचे अभियान हाती घेतले. त्यानुसार १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत जिल्ह्यात कवच कुंडल अभियान राबवण्यात आले. त्यानंतर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढली. अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी १५ वर्षावरील युवकांना सुद्धा कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु अद्यापही प्रिकॉशन डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र कमीच आहे.

कोव्हिशील्ड लसींचा तुटवडा

जिल्ह्यात लसीकरण सुरू झाल्यापासून लसींचा कमी अधिक प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. दरम्यान सध्या जिल्ह्यात कोव्हिशील्डचे दोन हजार, कोव्हॅक्सीनचे १५ हजार आणि कोर्बेव्हॅक्सचे ५४ हजार डोस शिल्लक आहेत. त्यापैकी कोव्हिशील्डचे सर्वात कमी दोन हजार डोसच बाकी असल्याने सदर डोसचा साठा केवळ ४ दिवसच पुरणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सदर लसींचे ७ हजार डोस मिळावे, अशी मागणी वरिष्ठ स्तरावर केली आहे.

लसीकरणात पुरूष पुढे

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात पुरूष हे महिलांच्या तुलनेत पुढे आहेत. जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार २४३ पुरुषांची कोरोनाचे डोस घेतले असून १० लाख २२ हजार ८४६ महिलांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यामुळे महिलांच्या तुलनेत पुरषांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते.

अशी आहे लस घेणाऱ्यांची स्थिती

एकूण २१ लाख ७५५

पहिला डोस १२ लाख २३ हजार ५०६

दुसरा डोस ८ लाख ५१ हजार ९७१

प्रिकॉशन डोस २५ हजार २७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT