ridhora SYSTEM
अकोला

रिधोरा येथे २५० बकऱ्यांसह ४० कोंबड्यांचा मृत्यू, २०० घरांची पडझड

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि. अकोला) : तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून घरे व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर रिधोरा (akola rain update) येथे कहर करत पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गावातील २० घरे जमीनदोस्त झाली असून दोनशे विस घरांची पडझड झाली आहे. तर अडीचशे बकऱ्यांसह चाळीस कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. (250 goats and 40 hens died due to rain in ridhora of akola)

बुधवारी रात्री अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे बाळापूर तालुक्यातील व्याळा, रिधोरा शिवारात ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाल्याने पावसामुळे शेतीसह घरांची पडझड झाली आहे. तर रिधोरा गावात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडला आहे. या पाण्यात रिधोरा येथील विस घरे पाण्याखाली गेली असून अडीचशे घरांची पडझड झाली आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने गोठ्यात बांधलेल्या अडीचशे बकऱ्यांसह चाळीस कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या आहेत, तर यातील काही बकऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. याघटनेत लाखो रुपयांची हानी झाली आहे. तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. रिधोरा नाल्याजवळील बांध फुटल्याने पुराचे पाणी गावात शिरले. ही घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच पटवारी प्रशांत बुले, सरपंच संजय अघडते, गणेश वाडकर, राजाभाऊ देशमुख, विशाल दंदी, शिवा वाकोडे, प्रमोद चौधरी, गजानन शेजोळे, अमोल लव्हाळे, मंगेश गवई, सुजय देशमुख, अमोल तेलगोटे, , सुमित खंडारे, धर्मेद्र दंदी, नितीन देशमुख, यांच्यासह युवकांनी पाण्यात अडकलेल्या नागरीकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून येथील जिल्हा परिषद शाळेत जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, पुराच्या लोंढ्यात संसारोपयोगी साहित्य, दोन दुचाकी पाण्यात वाहून गेल्या तर धान्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली.

घराच्या छतावर काढली रात्र -

बुधवारी रात्री अचानक पाऊस आल्याने संपूर्ण रिधोरा गाव जलमय झाले. येथील नाल्याकाठी वास्तव्यास असलेल्या कांबळे कुटुंबीयांच्या घरात पाणी शिरले. घराभोवती पंधरा ते विस फूट पाणी असल्याने त्यांना बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी घराच्या छतावर रात्र जागून काढली.

महामार्गावरील वाहतूक ठप्प

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गावर चार फुटांपर्यंत पाणी असल्याने तब्बल चार ते पाच तास वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. गुरुवारी रात्री आठ वाजतापासून मध्यरात्रीनंतर वाहतूक ठप्प होती.

शासकीय यंत्रणा गावात दाखल -

गुरुवारी सकाळी आमदार नितीन देशमुख यांच्यासह शासकीय यंत्रणा गावात दाखल होत पुरपरीस्थीतीची पाहणी केली. पावसामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली असून आमदारांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तर तातडीची पाच हजर रुपयांची सानुग्रह मदत देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार डि एल मुकूंदे, प्रभारी मुख्याध्यापक परमानंद धोटे, सभापती मंगेश गवई, मनोज अग्रवाल, ग्रामसेवक रविंद्र इंगळे, विलास पोटे, मंडळ अधिकारी व तालुका प्रशासनाची टीम होती.

दधम येथील गावतलाव फुटला -

अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खंडाळा, अंदुरा, खिरपूरी, निमकर्दा येथेही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. तर दधम येथील गाव तलाव फुटला आहे. प्रशासनाने नदीकाठी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT