480 reports of Akola Marathi News Corona; 31 new positive, 25 discharged 
अकोला

कोरोनाचे ४८० अहवाल ; ३१ नवे पॉझिटिव्ह, २५ जणांना मिळाला डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून गुरुवारी (ता. ७) कोरोना संसर्गत तपासणीचे ४८० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४४९ अहवाल निगेटिव्ह तर ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने जिल्ह्यात थैमान घातलं आहे. कोरोनाचे गुरुवारी (ता. ७) जिल्ह्यात ३१ नवे रुग्ण आढळले. त्यात सकाळी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

त्यात ११ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील शास्त्री नगर येथील पाच, मोठी उमरी येथील चार, डाबकी रोड, अकोट, व्हिएचबी कॉलनी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शिवणी, सिंधी कॅम्प, जुना आरटीओ रोड, वाशीम बायपास, हरिहर पेठ, गीता नगर, गोरक्षण रोड, राधाकिसन प्लॉट, जिल्हा परिषद कॉलनी, अंदुरा ता. बाळापूर व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे.

सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर, तेल्हारा व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे. याव्यतिरीक्त गुरुवारी (ता. ७) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, आयकॉन हॉस्पीटन येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, तर बिहाडे हॉस्पीटल येथून तीन तसेच होम आयसोलेशन येथून १०, अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १०७६६
- मृत - ३२३
- डिस्चार्ज ९८९४
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५४९

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT