A time of starvation for astrologers because of the corona File Photo
अकोला

ज्योतिष सांगणाऱ्यांचे भविष्य अंधारातच!

कोरोनामुळे ज्योतीष्यकारांवर उपासमारीची वेळ

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर जैन (जि.वाशीम) ः कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाउन व संचारबंदी (Lockdown) सारखे निर्बंध लावल्याने फिरस्ती आणि पालावर राहणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहर किंवा तालुकास्तरीय गावांच्या रस्त्यावर पालावर राहणारे हे कुटुंब खेड्यापाड्यात जाऊन आपला उदरनिर्वाह चालवितांना ज्योविष्य व्यवसाय करतात. परंतु, कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने संचारबंदी सुरू केल्याने इतरांचे ज्योतिष्य सांगणाऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अशा ज्योतिष्यकारांनी आपल्या गावी परतण्यावर भर दिला आहे. A time of starvation for astrologers because of the corona

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन व संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जागोजागी मोकळ्या जागेत पाल टाकून जीवन जगत असलेल्या कुटुंबातील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून विविध गावी जाऊन भविष्य सांगून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणारे परिवार अनेक ठिकाणी पाहायला मिळतात.

त्यांच्या कुटुंबातील लहान मुले-मुली नजीकच्या गावांमधील सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतात, मात्र मागील वर्षी कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायावर संकट आले होते. लॉकडाउनमध्ये एसटी बस सेवा बंद असल्याने ज्योतिषीचा पीढीजात धंदाही करता येत नसल्यामुळे या परिवारावर आपल्या गावी निघून जाण्याची वेळ आली.

आता यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाल्याने ज्योतिष्यकारांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे, अशा भावनिक प्रतिक्रिया हे कुटुंबा कडून ऐकायला मिळतात. मागच्यावेळी काही प्रमाणावर लॉकडाऊन च्या काळात शहरातील तथा ग्रामीण भागातील सुद्धा काही दानशूर मंडळींनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली होती.

पर्याय नसल्याने शेतात मजुरी

भविष्य सांगणे हा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील पुरुष मंडळी गावोगाव फिरून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कोरोनामुळे या कुटुंबाना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्याय नसल्याने दुसऱ्याच्या शेतात मजुरीचे काम देखील करावे लागते. लॉकडाउनमुळे एकूण सर्वच पर्याय संपल्याने, उदरनिर्वाह करणे अगदीच अवघड होत असल्याचे काही भविष्य व्यावसायिक सांगत आहेत. लवकरात-लवकर कोरोनाचे संकट सरो सर्व काही सुरळीत सुरू होवो, अशीच प्रार्थना सदर कुटुंब ईश्वराकडे करीत आहे.

संपादन - विवेक मेतकर

A time of starvation for astrologers because of the corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकोल्यात संतापजनक घटना! १२ वर्षीय मुलीवर वडील अन् काकांचा अत्याचार, शेजारच्या वृद्धाने लचके तोडले...

जावई असलास तरी चुकीला माफी नाही! अर्जुन बहिणीची फसवणूक करणाऱ्या सचिनच्या कानाखाली जाळ काढणार, नेटकरी म्हणतात-

Khambatki Ghat Accident : खंबाटकी घाटात लोखंडी साहित्यांनी भरलेला ट्रक पलटी; पाठोपाठ कारचाही अपघात, धोकादायक वळणं ठरताहेत जीवघेणी!

Chhatrapati Sambhajinagar News : २५ हजारांचा बकरा अन् २.५० लाखांची म्हैस! जनावरांच्या बाजारात बरबरी, बेंडॉमचा बोलबाला

Shreyas Iyer Fitness Update : श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर, न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी संघात परतणार?

SCROLL FOR NEXT