accident update Luxury bus overturned 26 passengers injured 10 seriously injured police hospital akola pune sakal
अकोला

Accident News: अकोल्यातून पुण्याकडे येणारी लक्झरी बस पलटी; २६ प्रवासी जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

देवरी -शेगांव मार्गवारील हनवाडी फाट्यानजीकची घटना

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अकोला- दर्यापूर-अकोट मार्गे पुणे करता जाणारी लक्झरी बस देवरी-शेगाव मार्गावरील हनवाडी फाट्यानजीक रात्री सुमारे सव्वा सातच्या सुमारास पलटी झाली. त्यामध्ये २६ प्रवासी जखमी झाले असून, दहाच्या वर गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

जखमींवर अकोल्यातील खाजगी व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. काही गंभीर रुग्णांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अकोला येथून नियमित श्री गणेश ट्रॅव्हलच्या मालकीची एमएच ३०, १२०१ ही लक्झरी बस पुणे करिता धावते. दुपारी तीनच्या सुमारास ही बस अकोल्या वरून पुण्यासाठी रवाना झाली.

दरम्यान, अकोटवरून पंधरा किलोमीटर अंतरावर देवरी ते अडसूळ दरम्यान येणाऱ्या हनवाडी ते पिवंदळ फाट्यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस बाजूच्या शेतात जावून पलटी झाली.

यामध्ये तब्बल २६ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील दहा जण गंभीर असल्याची माहिती आहे. या सर्व रुग्णांच्या मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थ पुढे आले, आठ रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील रात्री नऊच्या सुमारास आणण्यात आले असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.

मदतीला धावले शेकडो हात

सर्वोपचार रुग्णालयात रात्री नऊच्या सुमारास रुग्णवाहिकेतून जसे रुग्ण आले तसे शेकडो हात मदतीला धावून आले. कोणाचे हात, पाय फ्रॅक्चर तर कोणी रक्ताने माखलेले, गंभीर अशा अवस्थेत असणाऱ्या रुग्णांना अपघात कक्षातील डॉक्टर,

नर्स यांची चमू वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर, एसडीपीओ सुभाष दूधगावकर, सिटी कोतवाली ठाणेदार चंद्रशेखर कडू, रुग्णसेवक पराग गवई, शिवाजी कॉलेजचे विद्यार्थ्यांनी देखील सहकार्य केले.

अशी आहेत जखमींची नावे

भाग्यशीला दारोकार, उमा दारोकार, सूरज हातेकर, सुरज दारोकार, संतोष दारोकार, संजीवनी दारोकार सर्व रा.अटकळी ता.तेल्हारा, गौरी पंचई, पुणे, भीमराव गवई म्हैसांग, भोला पवार, वडणेर गंगाई,

पांडुरंग सोळंके सामदा ता.दर्यापूर, उदय शिंदे, मलकापूर अकोला, गौरी निचळ, विवंश निचळ अकोला, रोशन डीडोकार, अकोट, विक्की पटेल अंजनगाव सुरजी, संदीप पवार यवदा, विजय काटोले, अकोट, स्नेहल उमाळे दर्यापूर लता अभ्यंकर विहिगाव अमरावती सुरज येथे अंजनगाव भरत माकोडे नानाभाऊ ओळंबे विकी पाटील रवी मोहोळ सर्व राहणार अंजनगाव, अरुण वानखडे अमरावती,अंकित साखरे माऊली धांडे, कीर्ती अरबे, बजरंग अरबे राहणार पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT