agitation against Leader Opposition who insulted the employees of the Corporation sakal
अकोला

मनपा कर्मचाऱ्यांना शिविगाळ करणारे विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध आंदोलन

प्रभाग रचनेसाठी नगररचना विभागाच्या कर्मचाऱ्यांना धरले वेठीस

सकाळ वृत्तसेवा

मनपा कर्मचाऱ्यांना शिविगाळ करणारे विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध लेखणी बंद आंदोलन

प्रभाग रचनेसाठी नगररचना विभागाच्या कर्मचाऱ्यांना धरले वेठीस

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिकेतील विरोध पक्ष नेते तथा काँग्रेसचे नगरसेवक साजिद खान पाठण यांनी प्रभाग रचनेवरून मनपाच्या नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या दालनात तीन तास ठांबून ठेवले व अश्लिल शिविगाळ गेला. या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लेखी बंद आंदोलन सुरू केले.

अकोला महानगरपालिकेची प्रभाग रचना ता. १ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाली. त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. हरकती व सूचना नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगाने संधी दिली असतानाही प्रभाग रचनेवर आक्षेप घेत मनपाचे विरोधी पक्ष नेते साजिद खान पाठाण यांना गुरुवारी रात्री मनपाचे सहायक नगररचनाकार संदीप गावंडे व उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते यांना त्‍यांच्या दालनात बोलविले. प्रभाग रचना करताना माझ्या प्रभागाची वाट का लावली? असा प्रश्न करून त्यांनी अश्लिल शिविगाळ करण्यास सुरुवात केली. सोबतच तीन तास या कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. अखेर रात्री ८ वाजताच्या सुमारास मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांना ही माहिती मिळताच त्यांनी थेट मनपा कार्यालय गाठून दोन्ही कर्मचाऱ्यांना त्यांचा दालनात घेवून गेल्यात. विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी त्यांचे म्हणने लेखी देण्याची सूचना केली. या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी महानगरपालिकेत उटले. भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळीच सर्व कर्मचाऱ्यांना लेखी बंद आंदोलन करण्याचे आवाहन केले. काळ्याफितीलावून कर्मचाऱ्यांनी लेखी बंद आंदोलन सुरू करीत मनपा विरोधी पक्ष नेत्यांच्या निषेध नोंदविला. कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणे, त्यांचे खच्चीकरण करणे व अर्वाच्च भाषेचा वापर करण्याची घटना खेदजण असल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून विरोध पक्ष नेते साजिद खान पठाण यांचा निषेध नोंदविला. भविष्यात अशा घटना घडू नये या करीता मनपा कर्मचाऱ्यांतर्फे निवेदनही देण्यात आले. या आंदोलनात भारतीय कामगार सनेच्या अकोला महानगरपालिका युनिटचे अध्यक्ष कार्याध्यक्ष योगेश मारवाडी, सरचिटणीस सुनील इंगळे, गणेश गावंडे, सचिन सावजी, सहखजिनदार महेश राऊत, संजय खोसे, सरफराज मोहम्मद, मनिष पाटील यांचेसह मोठ्या संख्येने मनपा कर्मचारी सहभागी झालेत.

....................

हरकती व सूचना न नोंदविता थेट कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार करून मनपा कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भारतीय कामगार सेना खपवून घेणार नाही. कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे मानसित त्रास दिल्यास संपूर्ण मनपाचे कामगाज बंद पाडू. विरोध पक्ष नेत्यांच्या कृतीचा भारतीय कामगार सेनेकडून निषेध.

- योगेश मारवाडी, कार्याध्यक्ष, भारतीय कामगार सेना, अकोला मनपा युनिट'

.....................

भाजपच्या इशारावर प्रभाग रचना झाल्याचा आरोप

अकोला मनपाची प्रभाग रचना ही भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. भाजपच्या नेत्यांच्या इशाऱ्यावर प्रभाग रचना करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक व मनपा विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी केला आहे.

................................

राजकीय वर्तुळातूनही निषेध

राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर करतानाच कुणाला त्याबाबत आक्षेप असेल तर त्यावर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी वेळ दिला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेबाबत आयोगाकडे आक्षेप नोंदवून त्यांचे म्हणणे मांडता येत असताना मनपा कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबद्दल मनपा विरोधी पक्ष नेत्यांच्या कृतीचा राजकीय वर्तुळातही निषेध नोंदविण्यात आला. शिवसेवा, भाजपसह इतरही पक्षांनी ही कृती समर्थनिय नसल्याचे म्हटले आहे.

.......................

स्टंंट बुंमरँग

विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी प्रभाग रचनेवरून मनपा कार्यालयात कर्मचाऱ्यांना वेठीस धरत स्टंट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाषेवर नियंत्रण न ठेवता आल्याने त्यांचा हा स्टंंट दुसऱ्या दिवशी त्यांचावरच बुंमरँग होताना दिसत आहे. कर्मचाऱ्यांना आंदोलनामुळे विरोधी पक्ष नेते साजित खान पठाण अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT