अकोला

अकोला : कोविड मृत्यू अनुदानात ७० अर्ज मंजूर

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अपूर्ण कागदपत्रे व कोविड अहवाल निगेटिव्ह असतानाही कोविड मृत्यू सहानुग्रह अनुदानासाठी अर्ज करणारे अनुदानासाठी अपात्र ठरले होते. त्यापैकी ता. २३ फेब्रुवारीपर्यंत १५५ अर्जदारांनी अपात्रतेला महानगरपालिकेच्या तक्रार निवारण समितीकडे आव्हान दिले होते. त्यावर झालेल्या सुनावणीत ७० अर्ज अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

कोविड- १९ आजाराने मृत पावलेल्या रुग्णांच्या निकट नातेवाईकांना सहानुग्रह अनुदान पन्नास हजार रुपये मदत म्हणून प्रदान करण्याचा राज्य शासनाने ता. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्णय घेतला होता. त्यासाठी ऑनलाईन वेबपोर्टल विकसित केलेले आहे. त्यावर लॉगीन करून माहिती भरलेली आहे. परंतु काही मृतांच्या नातेवाईकांने भरलेले अर्ज हे अपूर्ण कागदपत्रे माहिती व्यवस्थित न भरल्यामुळे, कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्यामुळे आदी कारणामुळे अर्ज अपात्र झालेले आहेत.

अपात्र झालेल्या अर्जदारांकडून अपात्रतेला आव्हान देण्यात आले होते. आव्हान देणाऱ्या अर्जदारांची सुनावणी घेण्याकरिता शासनाच्या निर्देशानुसार तक्रार निवारण समिती महानगरपालिका स्तरावर गठीत करण्यात आलेली आहे. या समितीकडे मनपा क्षेत्रात कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे ऑनलाईन प्राप्त झालेले आहेत. या अर्जांवर वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने निकाली काढण्याचे काम सुरू केलेले आहे.

१३० अर्जावर सुनावणी आटोपली

ता. १५ ते २३ दरम्यान एकूण १५५ अपिल अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १३० अर्जदारांना सुनाणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ८५ अपिल अर्जदार उपस्थित राहिले. उर्वरीत ४५ अर्जदार गैरहजर होते. त्यापैकी ८५ अपिल अर्जदारांच्या कागदपत्रांची पुनश्च तपासणी करून ७० अर्ज पात्र ठरविण्यात आले तर १५ अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे. पात्र अर्जदारांना त्यांच्या समोर वेब पोर्टलवर पात्र असल्याबाबतची माहिती पाठविण्यात आली आहे. या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष डॉ. फारुख शेख, डॉ. प्रभाकर मुदगल, डॉ. अनुप चौधरी, डॉ. मो. मुस्लेहुद्यीन शेख, डॉ. अजमल खान तसेच शरद डोंगरे, निर्मला वानखडे यांनी ही सुनावणी घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT